नांदेड – महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाकडून 18 डिसेंबर हा दिवस “अल्पसंख्यांक हक्क दिवस” म्हणून साजरा करण्यात येतो. राज्य अल्पसंख्याक आयोगामार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्र व राज्य शासनाची माहिती सर्व नागरिकांपर्यत पोहचावी या उद्देशाने 18 डिसेंबर 2025 रोजी अल्पसंख्याक दिवस विविध उपक्रम राबवून साजरा करण्याबाबत निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आले आहेत. अल्पसंख्याक नागरिकांना त्यांच्या घटनात्मक व कायदेशीर हक्कांची जाणीव / माहिती होण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत. जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयामध्ये अशासकीय समाजसेवी संस्थाच्या मदतीने सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवी गट व विद्यार्थी यांच्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत. यात भित्तीपत्र स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, कार्यक्रमातील विजेत्यांना पारितोषिके, व्याख्यानमाला, चर्चासत्र, परिसंवाद इत्यादीचा समावेश असावा. तसेच अल्पसंख्याक विकास विभागाचे 10 डिसेंबर 2025 रोजीची परिपत्रकातील सूचनानुसार कार्यक्रमांचे आयोजन करावे तसेच कार्यक्रमाचे आयोजन करताना आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल शासनास सादर करावा. जिल्ह्यात सर्व विभाग प्रमुखांनी हा उपक्रम व्यापक प्रमाणात राबविण्यात यावा असे, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून निर्देशीत करण्यात आले आहे. Kanthak Suryatal Post Views: 635 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ठाणे पोलीस आयुक्तालयातील ११ चालक पोलीस शिपायांची सेवा समाप्त जिल्हा रुग्णालयात हृदयरोग निदान व आरोग्य शिबीर संपन्न