नांदेड(प्रतिनिधी)-पती-पत्नी दुचाकीवर जात असतांना पत्नीच्या खांद्यावर अडकवलेली 1 लाख 64 हजार रुपये ऐवजाची बॅग तीन अनोळखी चोरट्यांनी दुचाकीवर येवून बळजबरी चोरून नेली आहे. हा घटनाक्रम 2 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री 1 वाजता डॉ.शंकरराव चव्हाण चौक कामठा येथे घडला आहे. दिपक व्यंकटी शिरफुले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 2 नोव्हेंबर रोजी रात्री 1 वाजता ते आई आणि त्यांची पत्नी दुचाकीवर जात असतांना डॉ.शंकराव चव्हाण चौकात तीन अनोळखी लोक दुचाकीवर आले आणि त्यांच्या पत्नीच्या खांद्यावर अडकवलेली 1 लाख 64 हजार रुपये किंमतीचा ऐवज असलेली ती बॅग तीन चोरट्यांनी बळजबरीने चोरून नेली आहे. विमानतळ पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक 446/2025 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक साखरे हे करीत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 805 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल संस्थानी पायाभूत सोयी सुविधासाठी 14 नोव्हेंबरपर्यत अर्ज करावेत मयत मुलाच्या नावाचे 18 लाख रुपये सुनबाई आणि नातीला न सांगता काढून घेतले; गुन्हा दाखल