किरकोळ विक्रेत्यालाच कापुस बियाणे योग्य दरात मिळत नाही; शेतकऱ्यांची अवस्था काय होणार

नांदेड(प्रतिनिधी)-सध्या पेरणीचा हंगाम सुरू आहे. शासनाच्यावतीने असे प्रसिध्द पत्रक प्रसारीत करण्यात येते की, जादा दराने कोणी बियाणे, खते विक्री करत असेल तर त्याबद्दल तक्रार करावी. लोहा येथील श्रीहरी कृषी सेवा केंद्राने जिल्हा कृषी अधिक्षकांना पत्र दिले आहे की, खरीप हंगाम 2024 मध्ये विक्री करण्याकरीता रासायनिक खते व कापुस बियाणे, माफक दरात उपलब्ध करून द्यावेत. आता दुकानदारालाच माफक दरात साहित्य मिळत नसेल तर शेतकऱ्याची काय अवस्था हा प्रश्न या अर्जानंतर समोर आला आहे.
16 वर्षापासून अजितकुमार पाटील हे लोहा येथे श्रीहरी कृषी सेवा केंद्र चालवतात. यंदाच्या खरीप हंगामासाठी रासायनिक खते लिंकींगशिवाय मिळत नाहीत. कंपनीच्या या आडमुटी धोरणामुळे नाहक त्रास होत आहे. शेतकऱ्यांना आवडत नाही अशी खते घ्या असे म्हणावे लागत आहे. बीएपीमधील 10:26:26, 12:32:16, 20:20:13, 15:15:15 ही खते लिंकींग हवी असतात. वॉटर सोलुयर, झिंक, सल्फर अशी उत्पादने घेतल्याशिवाय होलसेल विक्रेत्याला इतर खते मिळत नाहीत.
कापुस बियाण्यां टंचाई असन कापुस उत्पादक कंपन्या हे या एमआरपीपेक्षा जास्त दराने बियाणे विक्री करत आहेत. तसेच लिंकींग सुध्दा घेण्यास भाग पाडत आहेत. शेतकऱ्यांना लागणाऱ्या 20-25 प्रकारच्या बियाण्यांची जादा दराने विक्री होत आहे. शेतकऱ्याला काही अडचण आली तर ती आमच्यासारख्या लहान दुकानदारांच्या माथी मारुन त्याच्याविरुध्द कार्यवाही होते. परंतू कंपन्यांवर काही होत नाही. माझ्या दुकानात 16 ते 20 हजार पॉकिटे कापुस बियाण्यांची लागतात. असलेल्या मुळ किंमतीपेक्षा आम्हाला सुध्दा जास्त दराने विक्री करावी लागेल. आधीच शेतकरी परेशान आणि त्यात अशी कृत्रीम टंचाई तयार करून 864 रुपंयाची कापुस बियाण्यांचे पॉकिट 28 रुपयांना विक्री करण्यास भाग पाडले जात आहे. श्रीहरी कृषी सेवा केंद्राने मागिल तीन वर्षामध्ये विक्री केलेल्या कापुस बियाण्यांप्रमाणे यंदा 28 प्रकारच्या विविध कापुस बियाण्यांची मागणी केली आहे. तसेच 550 टन वेगवेगळी खते लागतात असे जोडपत्र सुध्दा या अर्जासोबत दिले आहे. किरकोळ विक्रेत्यालाच योग्य दरात साहित्य मिळत नाही तर तो शेतकऱ्यांना योग्य दरात कसा पुरवेल असा प्रश्न या निमित्ताने समोर आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!