भोकर (प्रतिनिधी) – आज दि. १ ऑक्टोबर २०२६  सेवा संकल्प अभियान २०२६ अंतर्गत जिल्हा शल्य चिकित्सक नांदेड डॉ.संजय पेरके साहेब, निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्य) डॉ राजाभाऊ बुट्टे साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार व ग्रामीण रुग्णालय भोकरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रताप चव्हाण सर यांच्या निरीक्षणाखाली ग्रामीण रुग्णालय भोकर येथे आज जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन साजरा करण्यात आला. यावेळी सर्व ज्येष्ठ रुग्णांना आयुष पद्धतीने जीवनशैलीचे मार्गदर्शन करण्यात आले. या शिबिरामध्ये सर्व ज्येष्ठ नागरिकांची नेत्र तपासणी, रक्तदाब तपासणी व रक्ताच्या विविध चाचण्या करण्यात आल्या तसेच योगाचे प्रात्यक्षिक देखील घेण्यात आले.  या कार्यक्रमांमध्ये आयुष वैद्यकीय अधिकारी यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोप डॉ.प्रताप चव्हाण वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय भोकर यांच्या मार्गदर्शनाने संपन्न झाला.
यावेळी डॉ. मायादेवी नरवाडे, आयुष वैद्यकीय अधिकारी डॉ विजयालक्ष्मी घोडजकर किणीकर, डॉ. मुद्दशीर, डॉ थोरवट,नेत्र चिकित्सक संतोष करपे, आरोग्य मित्र सुधाकर गंगातिरे तसेच रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!