नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्यासहित राज्यात दुष्काळ पडल्याने ऑटो चालकांचे चलन माफ करून तात्काळ आर्थिक मदत मिळणे बाबत व नांदेड शहरात वाहतूक पोलीसाकरवी जुजबी कारवाई शहरी ऑटो चालकांवर होत असल्याने सदरील कारवाया थांबविणे साठी जयहिंद ऑटो सेना महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष डॉ मोहम्मद आरीफखान पठाण यांच्या नेतृत्वाखाली 30 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री. परिवहन मंत्री. परिवहन आयुक्त यांना जयहिंद ऑटो सेनेचे जिल्हाध्यक्ष मोहम्मद साजिदराज यांनी निवेदन देऊन प्रशासनाला जागे केले आहे. तशी मागणी करणारी राज्यातील एकमेव ऑटो संघटना आहे. महाराष्ट्रात पाऊस न पडल्याने भीषण दुष्काळ पडला असून मराठवाड्यातील नांदेड जिल्हा सर्वात जास्त प्रभावित झाला आहे. शेतकरी रोज आत्महत्या करत आहेत, शेती जळून गेली आहे, बाजारपेठेत मंदी आहे, त्यामुळे आम्हा ऑटो चालकांना प्रवासी मिळत नाहीत. पेट्रोल CNG महाग झाल्याने ग्राहक पैसे देण्यास टाळाटाळ करतात. ज्यामुळे ऑटो चालकांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. घरात लहान मुले, वृद्ध आई-वडील, त्यांच्या दवाखान्याचा खर्च, मुलांच्या शाळेची फी, घरभाडे, मुलींच्या लग्नाची चिंता असताना, एकीकडे खाजगी फायनान्स व बँक वाले आमचा छळ करत आहेत आणि दुसरीकडे वाहतूक पोलिसांकडून चालन वसुली व गाड्या जप्तीची कारवाई सुरू आहे. हे आमच्यावर अन्यायकारक आहे. यामुळे आमचे आणि आमच्या परिवाराचे उदरनिर्वाह होत नाही. बेरोजगारी वाढल्याने ऑटो चालकांच्या संख्येत सुध्दा भर पडलेली आहे. ज्यामुळे ऑटो चालकांचे दर दिवशीचे उत्पन्न तोकडे होत चालले आहेत. करीता शासनास विनंती करीत आहोत की धर्मवीर आनंद दिघे योजनेतून आमच्या परिवाराचा. लेकरा बाळाचा विचार करून सहकार्य मदतीच्या रुपाने करण्यात यावी. तरी शासनाला आमची अंतिम मागणी आहे: १) ऑटो चालकांचे सर्व चालन तात्काळ माफ करण्यात यावे. २) वाहतूक शाखेची जाचक कारवाई तात्काळ थांबवावी. ३) खाजगी फायनान्स व बँकांच्या जाचक वसुलीला आळा घालावा. ४) दुष्काळामुळे ऑटो चालकांना शासनातर्फे तात्काळ आर्थिक मदत जाहीर करावी. आपण गरीब ऑटो चालकांच्या व्यथा समजून घेऊन तात्काळ न्याय द्यावा, अशी मागणी जयहिंद ऑटो सेनेचे जिल्हाध्यक्ष मोहम्मद साजिदराज सहित सामाजिक कार्यकर्ते तेजपाल सिंग .बालाजी देडे .राहुल शेळके .मोहम्मद सिराज .समीउल्ला खान .धीरज तायडे .शेख इसाक .सय्यद फैयाज .आमेर खान .हारून अली खान .खाजा खान पठाण .निसार भाई .सय्यद अजीज .मोहम्मद जिया .मोहम्मद तारीख .शब्बीर अली .मोहम्मद साबिर कुरैशी .मोहम्मद शाबुद्दीन कुरैशी .राजू रामराव जटेवार यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. Kanthak Suryatal Post Views: 242 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation हातात झाडू घेऊन दिव्यांगांची गांधीगिरी; शेकडो दिव्यांगांचा सहभाग, विशेष शाळांच्या चौकशीची सुद्धा केली मागणी ठाकरे सेनेच्या निष्ठावंतांचा सन्मान केला जाईल – संपर्कप्रमुख किशोर पोद्दार