सुप्रसिद्ध विचारवंत बालाजी थोटवे यांचे प्रतिपादन; धुक्याची दुलई पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते थाटात प्रकाशन नांदेड- भूतानची या राष्ट्राची धम्म संस्कृती ही केवळ एका धर्मापुरती मर्यादित नसून, ती तेथील लोकांची जीवनपद्धती, शासनव्यवस्था आणि निसर्गाशी असलेल्या नातेसंबंधांचा गाभा आहे. हिमालयाच्या कुशीत वसलेले भूतान हे जगातील एकमेव अधिकृत वज्रयान बौद्ध राष्ट्र म्हणून ओळखले जाते. या धम्म संस्कृतीची ओळख ‘धुक्याची दुलई’ या पुस्तकातून होते असे प्रतिपादन येथील ज्येष्ठ विचारवंत बालाजी थोटवे यांनी केले. ते पुस्तक प्रकाशन सोहळ्याप्रसंगी प्रमुख भाष्यकार म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सुरेश घुले, सेवानिवृत्त उपप्राचार्य प्रल्हाद हिंगोले, प्रकाशिका पूजा ढवळे, हिंगोली येथील सुप्रसिद्ध कवयित्री सिंधुताई दहिफळे, लेखक अनुरत्न वाघमारे यांची उपस्थिती होती. येथील अकथ प्रकाशन संस्थेच्या वतीने शहरातील हाॅटेल विसावा पॅलेस येथे ज्येष्ठ साहित्यिक अनुरत्न वाघमारे लिखित ‘धुक्याची दुलई’ या प्रवासवर्णनपर पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आणि काव्यपौर्णिमा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पुष्प आणि दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. माजी उपप्राचार्य प्रल्हाद हिंगोले यांच्या आणि मान्यवरांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन झाले. पुढे बोलतांना थोटवे म्हणाले की, भूतान आर्थिक प्रगतीपेक्षा लोकांच्या आनंदाला आणि मानसिक शांततेला अधिक महत्त्व देते. हे तत्त्वज्ञान थेट बुद्ध धम्माच्या करुणा, समाधान आणि मध्यममार्गावर आधारित आहे. भौतिक सुखाच्या मागे न धावता आध्यात्मिक आणि मानसिक उन्नती साधणे हा या संस्कृतीचा मुख्य उद्देश आहे, हे पुस्तकातून दुग्गोचर होते. यावेळी उपप्राचार्य प्रल्हाद हिंगोले, लेखक अनुरत्न वाघमारे, प्रकाशिका पूजा ढवळे, सिंधुताई दहिफळे यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोप प्राचार्य डॉ. सुरेश घुले यांनी केला. प्रास्ताविक प्रज्ञाधर ढवळे यांनी केले. कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन रणजित गोणारकर यांनी केले तर आभार नागोराव डोंगरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुनंदा वाघमारे, सुप्रिया वाघमारे, मैत्रा वाघमारे, विशालराज वाघमारे, शंकर गच्चे, प्रकाश ढवळे, पंचफुला वाघमारे, वसंत ढवळे, देविदास वाघमारे, नाना गायकवाड, माधव जाधव यांच्यासह अकथ प्रकाशन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी भूतान दौऱ्यावर गेलेल्या बौद्ध उपासक, उपासिका साहित्य क्षेत्रातील कवी कवयित्री तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. Kanthak Suryatal Post Views: 17 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळण्यासाठी शासनाचे प्रयत्न- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे