नांदेड (प्रतिनिधी) – जुन्या भांडणाच्या कारणावरून एका ३५ वर्षीय तरुणावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केल्याची घटना नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हडको परिसरातील राज मंडप डेकोरेशन येथे घडली. या प्रकरणी पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून एका आरोपीला अटक केली असून, अन्य दोघांचा शोध सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० जुलै २०२६ रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास हडको येथील राज मंडप डेकोरेशन येथे गणेश भुजंग मोरे (वय २४, रा. वाघाळा, नांदेड) व त्याचे दोन अनोळखी साथीदार यांनी संगनमत करून फिर्यादीचा भाऊ राजेश कचरू घोरे याला जुन्या वादाच्या कारणावरून शिवीगाळ केली. त्यानंतर लाथाबुक्क्यांनी मारहाण करत धारदार खंजराने वार करून त्याला गंभीर जखमी केले. या हल्ल्यात आरोपींचा जीव घेण्याचा उद्देश असल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. याप्रकरणी अनिश कचरू घोरे (वय ३५, रा. वाघाळा, नांदेड) यांच्या फिर्यादीवरून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ८९२/२०२६ दाखल करण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ अंतर्गत कलम १०९, ११५(२), ३५२, ३५१(२)(३), ३(५) तसेच शस्त्र कायदा कलम ४/२५ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणातील एका आरोपीला पोलिसांनी अटक केली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बारोळे हे करीत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 1,442 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation रामतीर्थ पोलिसांची अवैध रेती वाहतुकीवर धडक कारवाई; 40.20 लाखांचा मुद्देमाल जप्त उमरीत घरफोडी; घराचे कुलूप तोडून ५० हजारांची रोकड लंपास