नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड पोलीस परिक्षेत्रातील 82 पोलीस अधिकाऱ्यांना परिक्षेत्रातील चार जिल्ह्यांमध्ये बदली देण्याचे आदेश पोलीस उपमा निरीक्षक शहाजी उमाप यांनी यामध्ये अनेक जणांना स्थगिती देण्यात आली आहे देण्यात आली आहे.या मध्ये काहींना एका वर्षाची स्थगिती देण्यात आली आहे काही जणांना विनंती नुसार बदली मिळाली आहे. बदल्या झालेल्या अधिकाऱ्यांची यादी पुढीलप्रमाणे आहे.
त्यात परभणी येथील पोलीस निरीक्षक पांडुरंग व्यंकाजी गवते यांना नांदेड जिल्ह्यात बोलावण्यात आले आहे. नांदेड येथील जगन गणपती पवार,परभणी येथील दीपक लक्ष्मण दंतुलवार आणि लातूर येथील सुधाकर मुरलीधर बावकर या तीन पोलीस निरीक्षकांना स्थगिती मिळाली आहे.
बदली झालेल्या सहायक पोलीस निरीक्षकांची अधिकाऱ्यांची नावे आणि त्यांचे ठिकाण खालीलप्रमाणे आहे:
नांदेड जिल्ह्यातून बदली झालेले अधिकारी: १. महादेव शिवाजी पुरी-नांदेड ते हिंगोली. २.संजय धोंडीराम निलपत्रेवार- नांदेड ते परभणी. ३. संकेत वसंतराव दिघे-नांदेड ते लातूर.(यांच्या बादलीने नांदेडचे नुकसान होणार आहे) ४. उमाकांत वैजनाथ पुणे- नांदेड ते हिंगोली. ५.हनुमंत हरिश्चंद्र मिटके – नांदेड ते लातूर. ६. वसंत शिवलिंग आरसेवार – नांदेड ते हिंगोली. ७. श्रीमती कमल विश्वनाथ शिंदे- नांदेड ते परभणी. ८. रामकृष्ण श्रीहरी पाटील: नांदेड ते लातूर. ९. पांडुरंग व्यंकट माने – नांदेड ते लातूर. १०.उमेश बालाजी भोसले: नांदेड ते परभणी.
परभणी जिल्ह्यातून बदली झालेले अधिकारी: ११. बालाजी बाबुराव पुंड- परभणी ते नांदेड. १२. मारुती उत्तमराव कारवार – परभणी ते लातूर. १३. सुनील सोनर अंधारे – परभणी ते लातूर. १४. राम हनुमंत गिते- परभणी ते नांदेड. १५. संजय तेजू चव्हाण – परभणी ते नांदेड. १६. संदीप आनंदराव बोरकर – परभणी ते हिंगोली.
लातूर जिल्ह्यातून बदली झालेले अधिकारी: १७.भाऊसाहेब बाबासाहेब खंदारे- लातूर ते परभणी. १८.भीमराव शंकरराव गायकवाड- लातूर ते नांदेड. १९. ज्ञानदेव प्रल्हाद सानप – लातूर ते परभणी. २०. विठ्ठल किशनराव दुरपडे – लातूर ते नांदेड.
या अधिकाऱ्यांच्या बदलीला १ वर्षाची स्थगिती मिळाली आहे: या आदेशासोबतच काही अधिकाऱ्यांच्या बदल्यांना १ वर्षाची स्थगिती देण्यात आली आहे, ते अधिकारी सध्या आहे त्याच ठिकाणी कार्यरत राहतील:
- दत्तात्रय गंगाधर मंटाळे (नांदेड).
- सुभाष गोकुळ माने (नांदेड).
- श्रीमती रेखा बन्सी काळे (नांदेड).
- मंगेश नरसिंग नाईक (नांदेड).
- श्रीमती मेधा प्रकाश निंबाळकर (लातूर).
६ सहायक पोलीस निरीक्षकांना विनंती ने मिळाली बदली:
सचिन तुकाराम गढवे नांदेड ते लातूर,सूचिता माधवराव शिंगाडे लातूर ते परभणी,सुधाकर नारायण चव्हाण लातूर ते परभणी,सुप्रिया सुभाषराव केंद्रे लातूर ते नांदेड,वसंत शेषराव मुळे लातूर ते नांदेड,रामदास महाजन नीरदोडे हिंगोली ते नांदेड.
नांदेड परिक्षेत्रातील ४० पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्या
१. नांदेड जिल्ह्यातून बदली झालेले अधिकारी:
- लातूर येथे बदली: कोंडीबा बापूराव केजगीर, बालाजी केशवराव नरवटे, महेश अशोकराव कोरे, मिलिंद मधुकर सोनकांबळे, महेश साहेबराव गायकवाड.
- परभणी येथे बदली: बालाजी होसाजी किरवले, परमेश्वर ठापुसिंग चव्हाण (यांना बाहेर पाठवल्याने नांदेड जिल्ह्याचे अतोनात नुकसान होणार आहे), जसपालसिंग राजसिंग कोटातिर्थवाले, रमेश साहेबाराव गायकवाड, शिवराज निवृत्ती नरवाडे.
- हिंगोली येथे बदली: आशिष सिताराम बोराटे, बाबुराव एकनाथराव चव्हाण.
२. परभणी जिल्ह्यातून बदली झालेले अधिकारी:
- लातूर येथे बदली: शिवकांत एकनाथ नागरगोजे.
- हिंगोली येथे बदली: संदीप भगवानराव गडदे,अमोल विठ्ठलराव गंगलवाड, कार्तिकेयेश्वर गुणाजी तुरनर.
३. लातूर जिल्ह्यातून बदली झालेले अधिकारी:
- नांदेड येथे बदली: रविंद्र मारोती तारु, मुरारी किशनराव गायकवाड, प्रशांतसिंह रघुनाथसिंह राजपूत, तानाजी व्यंकटराव पाटील, भगवान कुंडलीक मोरे.
- परभणी येथे बदली: गोपाळ तुळशीराम शिंदे, नागनाथ बालाजी मुंडे.
४. हिंगोली जिल्ह्यातून बदली झालेले अधिकारी:
- नांदेड येथे बदली: शिवाजी लक्ष्मणराव बोडले, सतीश माणिकराव टेंगे.
- परभणी येथे बदली: युवराज दत्तराव गवळी.
५. बदलीला स्थगिती मिळालेले अधिकारी (सध्याच्या नेमणुकीच्या ठिकाणीच राहणारे):
- नांदेड: श्री. नागोराव बालाजी कुंडगीर (१ वर्ष स्थगिती,यांना स्थगिती अत्यंत आवश्यक होती कारण नांदेडची आर्थिक गुन्हे शाखा त्यांच्या शिवाय पोरकी झाली असती) , हरिजंदरसिंग बलवंतसिंग चावला (स्थगिती), रामदास संभा श्रीमंगले (स्थगिती,यांच्या शिवाय भोकर तालुका चाललाच नसता ), गजानन विठ्ठलराव गाडेकर (१ वर्ष स्थगिती), महेश हनुमंत कुलकर्णी (स्थगिती).
- परभणी: अनिल उत्तमराव खिल्लारे (१ वर्ष स्थगिती), बालप्रसाद शेषराव चव्हाण (१ वर्ष स्थगिती), श्री. जमीलोद्दीन मोईनोध्दीन जहागीरदार (स्थगिती), पद्माकर गणपतराव पाठक (स्थगिती), राजेश रावणराव जाधव (स्थगिती), सुरेश वैजनाथ डोंगरे (स्थगिती).
- लातूर: अयुब गफुरसाब शेख (स्थगिती).
- हिंगोली: माधव एकनाथ जिद्दवार (१ वर्ष स्थगिती), श्रीमती श्रीदेवी दिलीप वांगे (१ वर्ष स्थगिती).
या शिवाय ७ पोलीस उप निरीक्षकांना विनंती प्रमाणे बदली देण्यात आली आहे.
रवी निवृत्ती घोडके नांदेड ते परभणी,विशाल पुरुषोत्तम बुधोडकर परभणी ते लातूर,चांदू मारोती मुजळगेकर परभणी ते नांदेड,निखिल गोविंदराव पवार लातूर ते परभणी,नागनाथ धोंडिबा पाटील हिंगोली ते लातूर,नितेश वामन लेनगुळे हिंगोली ते नांदेड,साहेबराव व्यंकराव कसबेवाड हिंगोली ते नांदेड.
महत्वाच्या सूचना: बदली झालेल्या सर्व अधिकाऱ्यांना संबंधित पोलीस अधीक्षकांनी तात्काळ कार्यमुक्त करावे, असे आदेश देण्यात आले आहेत. जे अधिकारी बदलीच्या ठिकाणी वेळेत हजर होणार नाहीत, त्यांच्यावर शिस्तभंगविषयक कारवाई करण्याचा इशाराही या आदेशाद्वारे देण्यात आला आहे.पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी आदेश दिले आहेत की, बदली झालेल्या सर्व सहाय्यक पोलीस निरीक्षकांना तात्काळ कार्यमुक्त करण्यात यावे आणि त्यांनी विहित मुदतीत नवीन नियुक्तीच्या ठिकाणी हजर व्हावे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
या सूचनांचे तंतोतंत पालन होते का? बदली झाल्यानंतरही अनेकांना मूळ ठिकाणीच का राखून ठेवले जाते, याचा शोध कोण घेणार? काही अधिकारी चार-चार वर्षे बदलीचे आदेश असूनही नवीन ठिकाणी रुजू होत नाहीत, तरीही व्यवस्था सुरळीत चालते. अशा प्रकरणांत शिस्तभंगाची कारवाई होईल, असे सांगितले जाते; मात्र प्रत्यक्षात ती कितपत होते, याबाबत जनतेमध्ये मोठी शंका आहे. त्यामुळे बदली प्रक्रियेतील पारदर्शकता आणि उत्तरदायित्व यांची गरज अधिक प्रकर्षाने जाणवते.
