बारामती काठी कऱ्हा नदीत एक गाथा बुडविली!

राठवाडा नामांतराचा विषय ऐन ऐरणीवर आला होता. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आम्हा काही मोजक्या अधिकाऱ्यांना मराठवाड्यात तात्पुरते पाठविले होते. परभणी जिल्ह्यात मी होतो. जातीवरून गावागावात उभी फूट पडली होती.नामांतराच्या बाजूचे,  विरोधाचे असे मोर्चे निघत. काही ठिकाणी दंगली चालू होत्या.
*माणसा माणसांमध्ये प्रेम वाढवण्याचे  मोहल्ला कमिटी हे मॉडेल आम्ही राबवीत होतो.   वर्तमानपत्रांचे रकानेच्या रकाने भरून येत होते. सरकारची अवस्था ‘इकडे आड आणि तिकडे विहीर’झाली होती.
*दोन दिवसात निर्णय होईल, तीन दिवसात निर्णय होईल अशा बातम्या वर्तमानपत्रात येत. तशी लोकांची उत्सुकता शिगेला पोहोचे. बैठका चालू. बातम्या चालू.पण हाती काहीच नाही.बंदोबस्ताला बाहेरून आलेले आम्ही अधिकारी कंटाळलो. पोलीस कंटाळले. मोर्चे काढणारे कंटाळले. संपादक कंटाळले. विचार  करण्याची क्षमता लोक हरवून बसले. आणि एक दिवस नामांतराचा शासकीय निर्णय झाला!
महाराष्ट्राची नाडी ओळखून निर्णय घेणारे ते होते पवार साहेब. खरे विज्ञानवादी आणि पुरोगामी विचाराचे.
*बहुजनांचा विकास संत महात्म्यांच्या विचारावरच होऊ शकतो या हेतूने  आम्ही गाथा परिवार तर्फे अनेक वर्ष काम चालविले. हे काम समजून घेऊन पुढे नेण्यासाठी अगदी अलीकडे पवार साहेबांनी  अनेक वेळा दीर्घ बैठकी घेतल्या. कामाला मदत जाहीर केली. तीच तळमळ, तोच विचार जाणवला. बारामतीचा आणि पवार कुटुंबाचा तोच ब्रँड महाराष्ट्राला माहीत होता. पण आक्रित घडलं.
*बारामती भागाचे नेतृत्व करणाऱ्या, पवार कुटुंबाचे जैविक, वैचारिक, राजकीय,…, वारसा चालविणाऱ्या खासदार सुप्रिया सुळे भोंदू बाबा अशोक खरात च्या संदर्भात बोलल्या.
” देवेंद्र फडणवीस यांच्या कामाची तुलना डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्याशी केली!” इलेक्ट्रिक झटका देणार विधान!
* देवेंद्र फडणवीस हा एक
स्वतःची ब्राह्मण जात ही सर्वश्रेष्ठ आहे असे मानणारा, राज्य व्यवस्थेवर ब्राह्मणी धर्म व्यवस्थेचे वर्चस्व राहिले पाहिजे यासाठी धडपडणारा एक कपटी, क्रूर, राजकारणी ब्राह्मण आहे . त्याची तुलना डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांचे बरोबर केली? सुप्रिया सुळे या एवढ्या अज्ञानी कशा याचे कोडे भविष्यात उलगडण्याचा प्रयत्न करणार आहोत.
*अनेक वेळा संसद रत्न मिळवलेल्या सुप्रियाताईंनी आयुष्यात सर्वात मोठे काय काम केले? सुप्रिया ताई यांनी
” पवार साहेबांचे वैचारिक संचित असलेली गाथाच आमच्या बारामती जवळून वाहणाऱ्या कऱ्हा नदीत बुडवली!”

– सुरेश खोपडे

 (पवार साहेबांच्या बद्दल लिहिताना भान ठेवा असा सल्ला अनेक जण देतात.2014 साली मी सुप्रिया ताईंच्या विरुद्ध निवडणूक लढविली होती.महाविकास आघाडी हा राज्यघटना मारणारा गट आहे म्हणून 2024 ला पवार साहेबांच्या शेजारी बसून ताईंचा  जाहीरपणे प्रचार केला. स्वतःच्या गाडीत स्वतःचे खिशातून पेट्रोल टाकून.
संपूर्ण नोकरीच्या काळात पवार कुटुंबाकडून कुठलीच मदत घेतली नाही. किंवा काम सांगितले नाही . उलट पवार साहेबांनी सांगितलेले एक काम करण्यास मी नकार दिला होता. काम सांगणाऱ्याने बैठकी अगोदरच खोपडे हा फार उद्धट आणि उर्मट अधिकारी आहे असे त्यांना सांगितल्याचे जाणवले. पण पवार साहेब हे मनात  खुन्नस ठेवणारे नेते नव्हेत )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!