नांदेड – शहरामध्ये अश्ववर्गीय प्राण्यांमध्ये ग्लॅन्डर रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून प्राण्यांमधील संक्रमण व सांसर्गिक रोग प्रतिबंध व नियंत्रण 2009 मधील तरतुदीनुसार नांदेड शहरामध्ये बाहेरुन येणाऱ्या व बाहेर जाणाऱ्या अश्ववर्गीय प्राण्यांची वाहतूक करण्यास प्रतिबंध केला आहे असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी निर्गमित केले आहेत. प्राण्यांमधील संक्रमण व सांसर्गिक रोग प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 2009 व ग्लॅन्डरच्या नियंत्रण व निर्मूलनासाठी राष्ट्रीय कृती योजना 2019 अंतर्गत पाच ते दहा किलोमीटर अंतर्गत असलेल्या गावातील अश्वास सर्वेक्षण आणि नांदेड या शहरांमध्ये झालेल्या ग्लॅन्डर रोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेता शहरातून बाहेर जाणाऱ्या आणि बाहेरुन येणाऱ्या अश्ववर्गीय प्राण्याची वाहतूक करण्यास या आदेशान्वये प्रतिबंध करण्यात आला आहे. Kanthak Suryatal Post Views: 842 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation 13 मार्च शेवटची संधी! नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ‘ॲग्रीस्टॅक’साठी त्वरित नोंदणी करावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे आवाहन लेंडी प्रकल्पास 90 कोटी रुपये निधी प्राप्त शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदानाचे वितरण व प्रकल्पाच्या घळभरणी काम सुरु करण्याचे जलसंपदामंत्री यांचे निर्देश