अमेरिकेचे राष्ट्रपती डोनॉल्ड ट्रम्प यांना अत्यंत बाणेदारपणे आपला देश आणि आपल्या देशाचे हित महत्वाचे आहे असे बोलून परत आलेल्या युक्रेनचे राष्ट्रपती ब्लादीमिर जेलन्स्की यांना अमेरिकेने आपल्या चक्रव्युहात फसवून त्यांच्यासमोर शरणागतीशिवाय पर्याय नाही हे दाखवून दिले आहे. युक्रेनमध्ये अमेरिकेेने वाजवलेली ही धोक्याची घंटा भारतासाठी सुध्दा घातक आहे. प्रभु श्री रामचंद्रांची शपथ आहे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना की त्यांनी आता आपले डोळे उघडावे नाही तर काय होईल याची कल्पनाच न केलेली बरी.
युक्रेनचे राष्ट्रपती ब्लादीमिर जेलन्स्की अमेरिकेचे राष्ट्रपती डोनॉल्ड ट्रम्प यांना भेटायला गेले त्यावेळी या दोन राष्ट्रप्रमुखांच्या भेटीमध्ये अमेरिकेचे उपराष्ट्रपती व्हॅन यांनी बरेच तेल टाकले. त्यानंतर ट्रम्प यांनी आक्रमक भुमिका घेत जेलन्स्कीला दाबून टाकण्याचा प्रयत्न केला पण जेलन्स्की सुध्दा आपल्या देशाच्या प्रति, आपल्या कर्तव्याच्या प्रति दृढ राहिले आणि ट्रम्पच्या दबावाला झुकले नाहीत. त्या दिवशीची डिनर पार्टी धुडकावून ते परत आले. त्यानंतर मात्र मोठे नाट्य घडले आणि अमेरिकेतील नेता किथ युक्रेन येथे विशेष दुत म्हणून पोहचले आणि तेथे त्यांनी 500 मिलियन डॉलर, युक्रेनच्या खनिज संपत्तीत वाटा आणि रशियासोबत शांती प्रस्ताव मांडला. युक्रेनने यावर पाहु अशी भुमिका घेतली तेंव्हा किथ यांनी त्यांना मोठी धमकी दिली. ती म्हणजे अशी की, तुमच्या येथील इंटरनेट सेवा बंद करू. वाचकांना माहित असावे युक्रेनमधील इंटरनेट सेवा एलॉन मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीची आहे. युक्रेनच्या युध्दातील ड्रोन ही त्यांची मोठी ताकत आहे आणि ते ड्रोन इंटरनेट सेवेशिवाय कामच करू शकणार नाहीत. अद्याप आम्ही हे विश्लेषण लिहिपर्यंत काय झाले या प्रस्तावाचे पुर्णपणे सिध्द झाले नाही. परंतू आपल्या व्यापाराचा उपयोग कुट नितीमध्ये करून युक्रेनवर आणलेला हा दबाव अमेरिकेकडे असलेल्या व्हेटोपावरपेक्षा जास्त मोठा दिसतो.
युक्रेनमध्ये झालेल्या चर्चेनंतर युरोपीय युनियन मात्र जागी झाली आहे. त्यांनी आपली अवलंबिता अमेरिकेवर राहु नये यासाठी आपसात चर्चा सुरू केली आहे. तसेच आपल्या सुरक्षा निधीमध्ये सुध्दा मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. कारण युरोपीय युनियनच्या मते ज्याप्रमाणे अमेरिका युक्रेनसोबत व्यवहार करत आहे. त्यात आमच्यावेळी सुध्दा असेच घडेल आणि आम्ही गुलाम बनू म्हणून आमची अवलंबता अमेरिकेवर विसंभून नसावी. काही दिवसांपुर्वी अमेरिकेच्या लोकांनी सुध्दा जगाला आवाहन केले होते की, अमेरिकेतल्या वस्तु खरेदी करू नका.युरोपीयन युनियनच्याप्रमाणे असेच घडणार आहे. अमेरिका वाटेल त्या दरावर त्यांच्याकडे असलेल्या बिनकामाच्या वस्तु जगाला विकेल आणि जगाकडून खरेदी करतांना आपल्या दराने खरेदी करेल. म्हणजे तो जगाला गुलाम बनविण्याच्या तयारीत आहे. युक्रेनचा शांती करार कसा असेल हे पण वाचकांसाठी मांडायचे आहे. त्यात आजपर्यंत मागील तिन वर्षात रशियाने युध्दादरम्यान युक्रेनच्या ज्या-ज्या भुमीवर अतिक्रमण केले आहे, त्या जमीनी आपल्या ताब्यात घेतल्या आहेत. त्या जमीनी परत होणार नाहीत. खरेतर शांती प्रस्तावात युध्दाच्या पुर्वीची स्थिती बहाल केली जात असते. पण अमेरिकेला रशियाशी काही घेणे देणे नाही. पण युक्रेनशी आहे. आज युक्रेनला कळले असेल की अमेरिकेने त्यांना केलेली मदत ही खऱ्या अर्थात मदत नव्हती तर त्यांच्या देशावर आवळलेला फास होता. अमेरिकेची नजर 500 बिलियन डॉलरवर आहे, युक्रेनच्या खनिज संपत्तीवर आहे. आता या पुढे अमेरिका युक्रेनला मदत करणार नाही. म्हणजे त्यांच्याकडे मरणे किंवा अमेरिकेकडे गहाण होणे यापेक्षा दुसरे पर्याय शिल्लक राहणार नाहीत. आमच्या मते तर युक्रेनने रशियासोबत संधी करावी, त्यांच्या देशात सहभागी व्हावे आणि अमेरिकेला ठेंगा दाखवावा.
युक्रेनमध्ये अमेरिकेने वा जवलेली धोक्याची घंटा भारतासाठी सुध्दा गळ्याचा फास होणार आहे. कारण युक्रेनचे राष्ट्रपती ब्लादीमिर जेलन्स्की बाणेदारपणे उत्तर देवून परत आले. पण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत गुडघे टेकून आले. आता भारताला तेल, गॅस, अमेरिकेतून खरेदी करावी लागेल. अमेरिकेत निकामी झालेली युध्दाची विमाने, भारतीय वायुसेनेत सहभागी करून घ्यावी लागतील. ऊर्जा क्षेत्रात सुध्दा अमेरिकेकडून आयात करावे लागेल. अर्थात भारत पुर्णपणे अमेरिकेवर अवलंबून राहिल. अर्थातच भारत आणि अमेरिका संबंधांमध्ये अमेरिका मदारी होईल आणि भारत माकड. कारण आज आम्ही इराणकडून तेल खरेदी करतो. ते तेल उच्च प्रतीचे असते. इराण येथून भारतात तेल आणणे हा वाहतुकीची खर्च कमी आहे. तसेच ते तेल उच्च प्रतिचे असल्याने त्याच्या शुध्दीकरणाचा खर्च सुध्दा अत्यल्प आहे.अमेरिकेकडून तेल घेतल्यावर अमेरिका त्याचा दर ठरवेल. ते दर इराणपेक्षा जास्त असतील. अमेरिकेतून भारतात तेल आणणे हा वाहतुकीचा खर्च जासत असेल. त्या तेलाची गुणवत्ता किती असेल यावर त्याच्या शुध्दीकरणाचा खर्च ठरेल. सोबतच स्टारलिंक भारतात सुध्दा आली आहे. सर्वप्रथम त्यांनी मणीपुरला इंटरनेट जाळे पसरविले आहे. ते आपले पाय भारतात पसरवणार आहेत. अमेरिकन कंपन्यांसाठी भारताने रेड कारपेट अंथरलेले आहे. अशा परिस्थितीत आम्ही अर्थात भारत देशपुर्णपणे अमेरिकेवर अवंबून जाणार आहे. इकडे चिनने आपल्या आणि त्यांच्यामध्ये असलेल्या मानवविरहीत जमीनीवर अनेक किलो मिटर अतिक्रमण केले आहे. सोबतच लद्दाखच्या जमीनीला मानवविरहीत जमीन घोषित करायला लावले आहे. राजकीय विश्लेषक पत्रकार अशोक वानखेडे यांच्या एक्सरेमध्ये या घटनांना पाहिले असता युक्रेन लवकर नष्ट होणार, अमेरिका जगावर दादागिरी करणार. या परिस्थितीत युरोपीय युनियनला जाग आली आहे. आमच्यावतीने भगवान प्रभु रामचंद्रांची शपथ आहे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना की, आपले डोळे उघडा आणि देशाच्या भल्याचा विचार करा.