नांदेड(प्रतिनिधी)-243-परंडा विधानसभा क्षेत्रातील एका उमेदवाराने दिलेल्या अर्जामुळे खळबळ माजली आहे. त्या अर्जाप्रमाणे मतदानाच्या दिवशी कोणीही अधिकारी, कर्मचारी, मतदार आणि निवडणुक प्रतिनिधी पायात चपला घालून मतदान कक्षात येवू शकत नाहीत. कारण त्या उमेदवाराला मिळालेली निशाणी चपला आहेत. 243 परंडा विधानसभा क्षेत्र जि.धाराशिव येथील अपक्ष उमेदवार गुरूदास संभाजी कांबळे यांनी परंडा निवडणुक निर्णय अधिकाऱ्याला दिलेला एक अजब अर्ज निवडणुक निर्णय अधिकाऱ्यासाठी नक्कीच त्रास दायक आहे. गुरूदास संभाजी कांबळे हे अरनगाव ता.परंडा जि.धाराशिव यांनी दिलेल्या अर्जानुसार त्यांचा उमेदवार अनुक्रमांक 12 आहे आणि त्यांना मिळालेली निशाणी ही चपला आहेत. या निशाणीला अनुसरून त्यांनी निवडणुक आचार संहितेचा भंग होवू नये म्हणून एक अर्ज दिला आहे. निवडणुक आचार संहितेत कोणतीही निशाणी जी उमेदवारांना मिळाली आहे ती प्रदर्शित करता येत नाही, प्रकाशित करता येत नाही. म्हणून त्यांच्या अर्जात त्यांनी असे लिहिले आहे की, माझी निशाणी चपला असल्यामुळे मतदान केंद्रापासून 200 मिटरच्या आत कोणीही व्यक्ती चपला घालून फिरेल तर तो निवडणुक आचार संहितेचा भाग होईल. यानुसाार गुरुदास संभाजी कांबळे यांची मागणी आहे की, दि.20 नोव्हेंबर रोजी मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रापासून 200 मिटर परिसरात कोणताही अधिकारी, कर्मचारी, उमेदवार, उमेदवाराचे प्रतिनिधी आणि मतदार यांना 200 मिटर अगोदरच चपला सोडून येण्यासाठी सुचित करावे. या अर्जावर आता परंडा विधानसभा क्षेत्रातील निवडणुक निर्णय अधिकाऱ्याला नक्कीच घाम सुटला असेल. Kanthak Suryatal Post Views: 1,103 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation पोलीसाने केलेले टपाली मतदान व्हायरल केेल्यामुळे गुन्हा दाखल Obtener cualquier préstamo desprovisto 1500 euros prestamo nómina siquiera aval