नांदेड(प्रतिनिधी)-गणपती बाप्पा मोरया…पुढच्या वर्षी लवकर या.. या गजराने नांदेड शहर दुमदुमले.दहा दिवस श्री गणेशाची आराधना करुन अनेकांनी आज त्यांना निरोप देतांना दाखवलेला उत्साह वाखणण्या जोगा होता. पण बिलोली तालुक्यातील बामणी गावात श्री गणेश विसर्जनासाठी गेलेल्या दोन सख्या बंधूंसह तीन बालकांचा मृत्यू झाला आहे. एक माणुस नांदेड शहरातील गोवर्धनघाट जवळ नदी पात्रात बुडाला होता परंतू लोकांनी […]
ताज्या बातम्या
सकल मराठा समाजातर्फे जरांगे पाटील यांची नांदेड मध्ये भव्य सभा
नांदेड (प्रतिनिधी)-मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले देऊन ओबीसी प्रवर्गात समावेश करावा या मुख्य मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या गावात मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषण करत होते,सरकारच्या मनधर्नी नंतर तब्बल सतराव्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांनी आपले आमरण उपोषण सोडलं आणि सरकारला चाळीस दिवसाचा अवधी देत त्याच ठिकाणी संबंध महाराष्ट्रामध्ये साखळी उपोषण करण्यात […]
पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे 29 व 30 सप्टेंबर रोजी आयोजन
नांदेड (जिमाका)- जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत 29 व 30 सप्टेंबर रोजी पंडीत दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, आनंदनगर रोड, बाबानगर नांदेड कार्यालयाचा ई-मेल nandedrojgar@gmail.com किंवा 02462 (251674) व […]
प्रधानमंत्री पिक विम्याचे 472 कोटी 51 लाख रुपये विमाधारक शेतकऱ्यांना वितरित
नांदेड (जिमाका) :- मागील वर्षी खरीप हंगाम 2022 मध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना पिकांचे नुकसान सोसावे लागले. जिल्ह्यातील 10 लाख 57 हजार 508 शेतकऱ्यांनी 6 लाख 51 हजार 422 हे. क्षेत्रावर पिक विमा उतरविला होता. प्रधानमंत्री पिक विमा योजना युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी मार्फत राबविली जाते. पिक विमा योजनेतील हंगामातील प्रतिकुल परिस्थिती (मिड सिझन ॲडव्हर्सिटी) घटकातील […]
अबु शुटरच्या मांडीवर गोळीमारून पोलीसांनी पकडले
नांदेड(प्रतिनिधी)-अनेक गुन्ह्यांमध्ये फरार असलेल्या एका गुन्हेगाराला पकडतांना त्यांने चाकू घेवून पोलीसांना धमकावल्यानंतर स्थानिक गुन्हा शाखेने त्याच्या मांडीवर गोळी मारून त्याला पकडले आहे. हा प्रकार भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नारायणा शाळेजवळ घडला आहे. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारा अबु शुटर उर्फ आवेज शेख मेहमुद हा पाहिजे असलेला गुन्हेगार स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाला कॅनॉल रोडजवळ दिसला. […]
लोकशाही दिनाचे मंगळवारी आयोजन
नांदेड (जिमाका) – सामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी ऐकून घेऊन त्या सोडविण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन साजरा करण्यात येतो. परंतु या महिन्याच्या पहिल्या सोमवारी महात्मा गांधी जयंतीनिमित्त शासकीय सुट्टी असल्यामुळे सदर लोकशाही दिन मंगळवार 3 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे आयोजित केला आहे. […]
शहर वाहतुक शाखा वजिराबाद जवळपास पुर्णपणे बदलली
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेडचे पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सप्टेंबर महिन्यात मनुष्यबळाची गरज असलेल्या वाहतुक शाखा इतवारा, वाहतुक शाखा वजिराबाद, पोलीस ठाणे शिवाजीनगर, विमानतळ, भाग्यनगर आदींना जास्तीचे मनुष्यबळ दिले आहे. काही जणांच्या मागे झालेल्या बदल्यांबाबत या आदेशात उल्लेख करून त्यांना बदलीच्या ठिकाणी मुक्त करण्यास सांगितले आहे. असे असले तरी पोलीस अधिक्षकांच्या मागील आदेशाप्रमाणे बरेच पोलीस अंमलदार आजही त्याच […]
लाच लुचपत प्रतिबंधक विभागातील पोलीस अंमलदाराकडून लाच मागणाऱ्या पोलीस अधिक्षक कार्यालयातील लिपीकाचे निलंबन
नांदेड(प्रतिनिधी)-लाच लुचपत प्रतिबंधक विभागात बदली झालेल्या एका पोलीस अंमलदाराचे पगार पत्रक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे पाठविण्यासाठी पैशांची मागणी करणाऱ्या पोलीस अधिक्षक कार्यालयातील एका लिपीकाला पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी निलंबित करून सर्वांसाठी एक इशारा दिला आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार पोलीस अधिक्षक कार्यालयात सत्यपाल चिंकेवार नावाचे एक लिपीक आहेत. नांदेड जिल्हा पोलीस दलातून काही पोलीस अंमलदाराच्या […]
देशात एक तारीख एक घंटा स्वच्छता अभियानात सहभागी व्हा-डॉ.महेशकुमार डोईफोडे
नांदेड(प्रतिनिधी)-देशात एक तारीख एक घंटा हे अभियान 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरदरम्यान राबवले जाणार आहे. या एका तासादरम्यान स्वच्छतेची मोहिम राबवली जाणार आहे अशी माहिती महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे यांनी जारी केली आहे. नांदेडमधील स्वच्छता प्रेमी नागरीक, ज्येष्ठ नागरीक, शाळा आणि महाविद्यालय, शिकवणी वर्ग, शासकीय आणि निमशासकीय कार्यालय, स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट, दवाखाने, एनसीसी […]
उद्याचा प्रवास पर्यायी मार्गांचा विचार करून सुनिश्चित करा-पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे
नांदेड(प्रतिनिधी)-उद्या दि.28 सप्टेंबर रोजी श्री गणेश विसर्जन होणार आहे. या दरम्यान 28 सप्टेंबरच्या सकाळी 11 ते रात्री 12 वाजेदरम्यान बरेच रस्ते वाहतुकीसाठी बंद असतील. त्याला पर्याय म्हणून पोलीस विभागाने पर्यायी रस्ते सुचवलेले आहेत. उद्याच्या आपल्या प्रवासाचा मार्ग ठरवतांना बंद असलेल्या रस्त्यांचा विचार करून आपला प्रवास मार्ग ठरवावा असे आवाहन पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी केले […]