ताज्या बातम्या शिक्षण

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास शक्य-कुलगुरू डॉ. उद्धव भोसले 

नांदेड (प्रतिनिधी)-स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच उच्च शिक्षणामध्ये क्रांतिकारक असा बदल होत आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० पुढच्या शैक्षणिक वर्षापासून विद्यापीठे व संलग्नित सर्व महाविद्यालयांना लागू करण्यात येणार आहे. या धोरणामध्ये कोणत्याही शाखेचा विद्यार्थी इतर कोणत्याही शाखेतील आवडीचे विषय घेऊन स्वतःचा विकास साधू शकतो. अशा या बहुआयामी शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास शक्य होणार आहे. असे प्रतिपादन विद्यापीठाचे कुलगुरू […]

ताज्या बातम्या शिक्षण

‘स्वारातीम’ विद्यापीठालीत डॉ. गच्चे, डॉ. कांबळे व डॉ. दवणे यांच्या संशोधनाला पेटंट

नांदेड (प्रतिनिधी)-स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील जैवशास्त्र विभागातील पूर्व कार्यरत असलेले प्रा. डॉ. राजेश गच्चे, संशोधक डॉ. सोनाली कांबळे व रसायनशास्त्र विभागातील प्रा. डॉ. भास्कर दवणे यांच्या संशोधनाला भारत सरकारकडून नुकतेच एकस्व (पेटंट) प्रदान करण्यात आले आहे. स्तन कर्करोग (ब्रेस्ट कॅन्सर) विरोधी वनस्पती रूपी औषधी निर्मिती संबंधित संशोधन त्यांनी केले आहे. या संशोधनकार्यातील संशोधक डॉ. […]

ताज्या बातम्या शिक्षण

धनुर्धारी सृष्टी पाटीलने घेतली उंच भरारी

नांदेड(प्रतिनिधी)-दक्षिण कोरिया येथे आयोजित भारतीय खेळाडूंच्या प्रशिक्षण शिबिरासाठी सोनीपत हरियाणा येथे दिनांक 28 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यान आयोजित निवड चाचणी प्रक्रियेत नांदेडची सुवर्णकन्या मराठवाडा एक्सप्रेस कुमारी सृष्टी बालाजी पाटील जोगदंडची अप्रतिम भरारी,अतिशय लहान वयापासून ऑलिंपिकचे ध्येय उराशी बाळगत “होय मला ऑलम्पिक मध्ये देशासाठी पदक मिळवायचा ” असा चंग बांधलेली सृष्टी ज्युनिअर वयोगटात आपली भारतीय […]

ताज्या बातम्या शिक्षण

अंगणवाडी सेविकांचे कार्य सामाजिक उत्तरदायित्वाचे आदर्श प्रतीक- आ. बालाजी कल्याणकर

नांदेड (प्रतिनिधी) – अंगणवाडी सेविका विविध आव्हानांवर मात करत केवळ शासकीय सेवा म्हणून नव्हे तर सामाजिक उत्तरदायित्व म्हणूनही तेवढ्याच जबाबदारीने आपले कर्तव्य पार पाडीत असतात. तुमचे योगदान व हे काम करतांना येणाऱ्या अडचणी मी जाणून असून अंगणवाडी दुरूस्ती पासून ते इतर सेवा-सुविधा कसा उपलब्ध करता येतील याबाबत सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे प्रतिपादन आमदार बालाजी […]

ताज्या बातम्या शिक्षण

हैदराबाद मुक्ती लढ्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विद्यापीठातर्फे छायाचित्र स्पर्धेचे आयोजन 

प्रथम, द्वितीय, तृतीय अनुक्रमे २१, १५, ११ हजार रुपये पारितोषिके  नांदेड(प्रतिनिधी)-स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातर्फे दरवर्षी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उध्दव भोसले यांच्या संकल्पनेतून छायाचित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यावर्षीचे हे चौथे वर्षे आहे. तसेच हैदराबाद मुक्ती लढ्याला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त हैदराबाद मुक्ती लढ्याचे हे अमृत वर्ष आहे. प.पूज्य स्वामी रामानंद तीर्थ यांच्या […]

ताज्या बातम्या शिक्षण

अशोक चव्हाण यांच्या यशवंत कॉलेजमध्ये प्राचार्याने केला प्राध्यापीकेचा विनयभंग

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेतील यशवंत महाविद्यालयामध्ये विद्यावाचस्पती पदवी प्राप्त प्राध्यापक महिलेला प्राचार्याने शरीरसुखाची मागणी करून तिचा विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे. नांदेड जिल्ह्यातील नामांकित शिक्षण संस्था यशवंत महाविद्यालय आहे. या कॉलेजची शिक्षण संस्था शारदा भवन शिक्षण सोसायटी आहे. या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नांदेड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री अशोक चव्हाण आहेत. या महाविद्यालयातील […]

ताज्या बातम्या शिक्षण

‘स्वारातीम’ विद्यापीठामध्ये २८ ते ३० जुलै दरम्यान गणितीय विज्ञानावर आंतरराष्ट्रीय परिषद

नांदेड (प्रतिनिधी)-स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये २८ ते ३० जुलै, असे तीन दिवशीय गणितीय विज्ञानावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेस देश-विदेशातील नामांकित संस्थेच्या तज्ञांची उपस्थिती लाभणार आहे. या परिषदेचे उद्घाटन २८ जुलै रोजी विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहामध्ये होणार आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले या परिषदेचे अध्यक्षस्थान भुसवणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून या […]

ताज्या बातम्या शिक्षण

‘स्वारातीम’ विद्यापीठांतर्गत पी.एचडी कोर्स वर्क आणि बहिस्थ शिक्षण परीक्षेच्या तारखेत बदल

नांदेड (प्रतिनिधी)-स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडाविद्यापीठांतर्गतउन्हाळी-२०२२पी.एचडी कोर्स वर्क परीक्षा या पूर्वीच्या वेळापत्रकानुसार १४,१५ व १६ जुलै या कालावधीमध्ये घेण्यात येणार होत्या. या तारखेमध्ये बदल करून त्या आता २५, २६ व २७ जुलै या कालावधीमध्ये घेण्यात येणार आहेत. तसेच बहिस्थ पदव्युत्तर अभ्यासक्रम एम.ए. व एम.कॉम उन्हाळी-२०२२ वार्षिक परीक्षा या १३ जुलै पासून सुरु होणार होत्या. त्या आता […]

ताज्या बातम्या शिक्षण

‘स्वारातीम’ विद्यापीठाचे ‘संशोधन कौशल्य विकास’ या विषयावर सात दिवसीय कार्यशाळेचे आयोजन 

नांदेड(प्रतिनिधी)-स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभाग आणि कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘संशोधन कौशल्य विकास’ या विषयावर दि. २५ ते ३१ जुलै असे सात दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत आहे. या कार्यशाळेमध्ये प्रयोगशाळेतील वेगवेगळे उपकरणे […]

ताज्या बातम्या शिक्षण

औरंगाबाद येथे युवकांसाठी आर्मी भरतीचे आयोजन

  नांदेड (प्रतिनिधी) – अग्नीपथ योजनेंतर्गत 13 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर 2022 या कालावधीत आर्मी भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद परिसरात होणाऱ्या भरतीत जास्तीत जास्त तरुणांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन कर्नल प्रविण कुमार एस यांनी केले आहे. भरती बाबतचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे. उमेदवाराचे वय 1 ऑक्टोबर 2022 […]