ताज्या बातम्या शेती

प्रधानमंत्री पिक विम्याचे 472 कोटी 51 लाख रुपये विमाधारक शेतकऱ्यांना वितरित

नांदेड (जिमाका) :- मागील वर्षी खरीप हंगाम 2022 मध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना पिकांचे नुकसान सोसावे लागले. जिल्ह्यातील 10 लाख 57 हजार 508 शेतकऱ्यांनी 6 लाख 51 हजार 422 हे. क्षेत्रावर पिक विमा उतरविला होता. प्रधानमंत्री पिक विमा योजना युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी मार्फत राबविली जाते. पिक विमा योजनेतील हंगामातील प्रतिकुल परिस्थिती (मिड सिझन ॲडव्हर्सिटी) घटकातील […]

ताज्या बातम्या शेती

वनविभागासमोर तीन महिन्यापासून सुरू असलेल्या धरणे आंदोलनातील एका महिलेचा मृत्यू

नांदेड(प्रतिनिधी)- मे 2023 पासून मराठवाडा सर्व श्रमिक कामगार संघटनेच्यावतीने उपवनसंरक्षक वनविभाग(प्रा) नांदेड यांच्या कार्यालयासमक्ष सुरू असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाला मृत्यूचा चटका लागला आहे. रात्री 3 वाजता एका 54 वर्षीय आंदोलनकर्त्या महिलेची तब्येत बिघडली. उपचारासाठी त्यांना दवाखान्यात नेल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन 3 महिन्यापासून सुरू आहे. मराठवाडा सर्व श्रमीक संघटनेचे निवेदन […]

ताज्या बातम्या शेती

फवारणी करतांना घ्यावयाची काळजी आणि गुलाबी बोंडअळी नियंत्रणासाठी मार्गदर्शन

नांदेड,(जिमाका)- शेतकऱ्यांनी किटकनाशक फवारणी करतांना घ्यावयाची काळजी तसेच ‘विषबाधा प्रतिबंधात्मक उपाययोजना, जनजागृती व गुलाबी बोंडअळी नियंत्रण’ या विषयावर मंगळवार 29 ऑगस्ट 2023 रोजी लोहा तालुक्यातील सातबारा (7/12) फार्मर प्रोडयुसर कंपनी, लोंढे सांगवी यांचे शेतावर फेसबुक लाईव्ह कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल व जिल्हा अधिक्षक […]

ताज्या बातम्या शेती

ई-पीक पाहणी ॲपद्वारे पीक पेरा नोंदविण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

  नांदेड (जिमाका) :- पात्र शेतकऱ्यांना विविध शेती विकासाच्या योजनांचा लाभ सुलभतेने मिळावा, पीक कर्ज, पीक विमा नुकसान भरपाई, नैसर्गिक आपत्ती काळात सुयोग्य शासकीय मदत मिळावी यासाठी ई-पीक पेरा नोंद गरजेची आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मोबाईल ॲपमध्ये ई-पीक पेऱ्याची अचूक नोंद करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.   खरीप हंगाम 2023 साठी क्षेत्रीय स्तरावरुन […]

ताज्या बातम्या शेती

पीएम किसान योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना ई-केवायसी प्रमाणीकरण करण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका) –  पीएम किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना कुटूंबनिहाय प्रति वर्ष 6 हजार रुपये इतके आर्थिक सहाय्य 3 टप्प्यामध्ये उपलब्ध करुन देण्यात येते. या योजनेअंतर्गत चुकीने मयत मार्क केलेल्या तथापि पात्र असलेल्या लाभार्थ्यानी पी.एम. किसान जीओआय (PMKISAN GOI) या ॲपचा वापर करुन पात्र करण्याच्या सुविधेचा वापर करावा. तसेच फेस ऑथेंटीफिकेशन द्वारे ई-केवायसी प्रमाणिकीकरण करुन पीएम किसान […]

ताज्या बातम्या शेती

कृषि विभागाच्यावतीने अनुदानावर गोदाम बांधकाम 

नांदेड (जिमाका) – कृषि विभागाच्या वतीने नांदेड जिल्ह्यासाठी अन्न आणि पोषण सुरक्षा अन्नधान्य पिके व राष्ट्रीय खाद्यतेल अभियान सन 2023-24 अंतर्गत स्थानिक पुढाकाराच्या बाबी अंतर्गत फ्लेक्झी फंडामध्ये गोदाम बांधकामासाठी लक्षांक प्राप्त आहे. प्राप्त लक्षांकाच्या आधीन राहुन शेतकरी उत्पादक संघ / कंपनी यांच्याकडून विहित नमुन्यात प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. इच्छुक लाभार्थ्यांचे अर्ज महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या […]

ताज्या बातम्या शेती

09 ते 15 ऑगस्ट दरम्यान देशभरात ‘मेरी माटी मेरा देश अभियान’ राबविण्यात येणार

देशातील सुमारे 7,500 ब्लॉकमधून तरुण त्यांच्या राज्यातील माती आणतील. नवी दिल्ली -:आझादी का अमृत महोत्सव (AKAM) 12 मार्च 2021 रोजी साबरमती ते दांडी या पदयात्रेने सुरू झाला. आता ‘मेरी माटी मेरा देश’ मोहिमेची संकल्पना स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा समारोप कार्यक्रम म्हणून करण्यात येणार आहे. या अभियानात ग्रामीण भागात वसुधा वंदन, शिलाफलकम (स्मारक) यासह अनेक कार्यक्रमांचे आयोजन […]

शेती

शेतकऱ्यांनी बियाणे, खते व किटकनाशक खरेदी करताना फसवणुक झाल्यास तक्रार करण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका) – शेतकऱ्यांनी बियाणे, खते व किटकनाशक खरेदी करताना काळजी घ्यावी.   खते बियाणे व इतर निविष्ठा खरेदी करताना फसवणूक झाल्यास शेतकऱ्यांनी पुराव्यासह 9970630379 या व्हाटसअप क्रमांकावर तक्रार पाठवावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बी.एस बऱ्हाटे  यांनी केले आहे. शेतकऱ्यांना विशिष्ट कंपनीचे खत किंवा बियाणे खरेदी करण्याची काही विक्री केंद्रे सक्ती करण्याची शक्यता […]

ताज्या बातम्या शेती

बाजारात युरिया खत मुबलक प्रमाणात उपलब्ध,शेतकऱ्यांनी युरिया खताची काळजी करु नये – जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बी.एस.बऱ्हाटे

नांदेड (जिमाका)- बाजारात युरीया खत मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी युरिया खताची काळजी करु नये. तसेच रासायनिक खत खरेदी करताना खत विक्रेते शेतकऱ्यांना इतर निविष्ठा खरेदीची सक्ती करीत असल्यास उपविभागीय कृषि अधिकारी, कृषि विकास अधिकारी जिल्हा परिषद, तालुका कृषि अधिकारी, कृषि अधिकारी पंचायत समिती यांच्याकडे तात्काळ तक्रार नोंदवावी. अथवा जिल्हा तक्रार निवारण कक्ष संपर्क […]

ताज्या बातम्या शेती

गोगलगायीचे वेळीच नियंत्रण करण्याचे कृषी विभागाचे आवाहन

नांदेड (जिमाका) :- मागील वर्षी सुप्त अवस्थेत गेलेल्या गोगलगायी चालू वर्षातील जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे जमिनीवर आलेल्या आहेत. गोगल गायीच्या प्रादुर्भावामुळे गतवर्षी सोयाबीन पिकाचे नुकसान झाले होते. यावर्षी ते होऊ नये म्हणुन सुप्त अवस्था संपुन जमीनीवर आलेल्या गोगलगायींचे नियंत्रण करणे गरजेचे आहे. गोगलगायीं अंडे टाकण्याच्या अगोदर नियंत्रण केले तर चालु हंगामातील सोयाबीन पिकाचे […]