नांदेड

दसऱ्याच्या दिवशी सापडला फक्त एक नवीन कोरोना बाधीत रुग्ण

नांदेड(प्रतिनिधी)-दसऱ्याच्या दिवशी 730 कोरोना अहवाल तपासणीमध्ये नांदेडमनपा हद्दीत फक्त एक कोरोना बाधीत नवीन रुग्ण सापडला आहे. प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सकांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आलेल्या माहितीनुसार 15 ऑक्टोबर रोजी एकाही रुग्णाचा कोरोना बाधेने मृत्यू झालेला नाही. आज मनपा अंतर्गत गृहविलगिकरणातून एका रुग्णाची सुट्टी झाली आहे. आज 730 अहवाल तपासण्यात आले. त्यातील 712 निगेटीव्ह आहेत आणि एक अहवाल […]

नांदेड

धम्मचक्र अनुवर्तनदिन उत्साहात साजरा

नांदेड(प्रतिनिधी)-डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दसऱ्याच्या दिवशी धम्मचक्र अनुवर्तन करून लाखो अनुयांसह बौध्द धर्म स्विकारला होता. या घटनेला आज 65 वर्ष पुर्ण झाली आहेत. आजचा धम्मचक्र अनुवर्तन दिन उत्साहात साजरा करतांना अनेक अनुयांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे दर्शन घेवून एक दुसऱ्याला शुभकामना दिल्या. दसऱ्याच्या दिवशी बोध्दीसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्वत: आणि आपल्या अनुयांयाना बौध्द धम्माची दिक्षा दिली. आधुनिक बौध्द शासनाचा […]

नांदेड

बळीरामपूर, वाजेगाव, धनेगाव आणि तुप्पा या गावांना पाण्यासाठी फिरावे लागते  वणवण

नांदेड(प्रतिनिधी)-पावसाने भरपूर हजेरी लावल्यानंतर सुध्दा शहराच्या जवळ असलेल्या बळीरामपूर, धनेगाव, वाजेगाव आणि तुप्पा या चार गावांमध्ये गेली दीड महिना पाण्याचे दुर्भीक्ष सुरू आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने पाणी पुरवठा लवकर सुरू केला नाही तर रस्त्यावर उतरू असा इशारा अनेक ग्राम पंचायत सदस्यांनी दिला आहे. बळीरामपूर, धनेगाव, वाजेगाव आणि तुप्पा येथील जनतेने दिलेल्या माहितीनुसार या चार गावांमध्ये […]

नांदेड

बोले सो निहाल सत श्री अकालच्या घोषणांनी आसमंत दुमदुमले

नांदेड(प्रतिनिधी)-कोरोना काळानंतर आज पहिल्यांदा हल्ला-महल्ला मिरवणूक बोले सो निहाल सत श्री अकालच्या घोषणांनी साजरा झाला. देशभरातून आजच्या या सणासाठी हजारो भाविकांचे नांदेडमध्ये आगमन झाले. कोरोना काळात हल्ला-महल्ला मिरवणूक काढावी, न काढावी यावर बऱ्याच चर्चा झाल्यानंतर आज दसऱ्याच्या दिवशी दुपारी 4 वाजता सचखंड श्री हजुर साहिब येथून पंचप्यारे साहिबान यांनी अरदास करून हल्ला-महल्ला मिरवणूकीला सुरूवात केली. […]

नांदेड

पोलीस अधिक्षकांनी डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना अभिवादन केले

नांदेड(प्रतिनिधी)-आज 15 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपुरूष, माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती पोलीस अधिक्षक कार्यालयात साजरी करतांना पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे आणि अनेक अधिकाऱ्यांनी त्यांना अभिवादन केले. शासनाने माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना राष्ट्रपुरूष या दर्जात त्यांची जयंती साजरी करण्याचे परिपत्रक जारी केले. आज पोलीस अधिक्षक कार्यालयात पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे, पोलीस उपअधिक्षक डॉ.सिध्देश्र्वर […]

नांदेड

आज त्रिवेणी संगमाच्या दिवशी नांदेड जिल्ह्यातील 190 पोलीसांना पदोन्नती

नांदेड(प्रतिनिधी)-दसरा, धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीदिनी पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी नांदेड जिल्हयातील 190 पोलीसांना पदोन्नत्या दिल्या आहेत. सर्व नवीन पदोन्नती प्राप्त पोलीसांना शुभकामना देत प्रमोद शेवाळे यांनी त्यांच्याकडून पोलीस दलाचे नाव जास्त उंचीवर न्यावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. नांदेड जिल्हा पोलीस दलातील 53 पोलीस हवालदारांना सहाय्यक पोलीस […]

नांदेड

रेल्वे प्रवासातील एका प्रवाशाच्या दक्षतेने अल्पवयीन बालक पुन्हा आपल्या घरी पोहचला

नांदेड(प्रतिनिधी)-12 ऑक्टोबर रोजी विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून गायब झालेल्या एका अल्पवीयन मुलाबद्दल भारतीय दंड संहितेच्या कलम 363 नुसार गुन्हा दाखल झाला. हा मुलगा एका जागरुक नागरीकाच्या चाणाक्ष नजरेने ओळखला आणि सुदैवाने तो परत घरी आला.या सह प्रवाशाचे नाव इब्राहिम खान मुस्तफा खान आहे. दि.12 ऑक्टोबर रोजी माझा अल्पवयीन मुलगा(वय 13) पळवून नेल्याची तक्रार गोविंद भगवानराव […]

नांदेड

गुरुवारी सापडले तीन नवीन रुग्ण आणि दोन कोरोना बाधितांची सुट्टी  

नांदेड,(प्रतिनिधी) – आज बुधवारी ७६१ तपासणीत तीन नवीन कोरोना बाधीत रुग्ण सापडले आहेत. आज उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या २१ आहे.कोरोना बाधेतून मुक्त होण्याची टक्केवारी ९७.०४ अशी आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नीलकंठ भोसीकर यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आलेल्या माहितीनुसार दिनांक १४ ऑक्टोबर रोजी  कोरोना बाधेने एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.आज तीन नवीन रुग्ण सापडले आहेत. मनपा गृह […]

नांदेड

यंदा नदीघाटांवर दुर्गामुर्ती विसर्जनास प्रतिबंध

जनतेने पासदगाव, झरी, गाडेगाव येथे दुर्गाविसर्जन करावे नांदेड(प्रतिनिधी)-गोदावरी नदी घाटांवर यंदा दुर्गादेवी मुर्ती विसर्जनसाठी प्रतिबंध करण्यात आला आहे. यासाठी पर्यायी व्यवस्था झरी, पासदगाव, गाडेगाव या तीन ठिकाणी करण्यात आली आहे. जनतेने या तिन ठिकाणी दुर्गामुर्तींचे विसर्जन करावे आणि प्रशासनास सहकार्य करावे असे महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागाने कळविले आहे. आज दि.14 ऑक्टोबर रोजी उपायुक्त शुभम क्यातमवार यांनी […]

नांदेड

15 व 16 ऑक्टोबर रोजी पर्यायी वाहतुकींचे मार्ग वापरा-प्रमोदकुमार शेवाळे

नांदेड(प्रतिनिधी)- दि.15 ऑक्टोबर रोजी होणारा दसरा महोत्सव आणि दि.16 ऑक्टोबर रोजी होणारे दुर्गा विसर्जन या दोन दिवसांसाठी शहरातील वाहतुकीला अनेक पर्यायी मार्ग तयार करण्यात आले आहेत. ही अधिसुचना पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांच्यावतीने जारी करण्यात आली आहे. दि.15 ऑक्टोबर रोजी शहरात साजरा होणार दसरा महोत्सव, हल्ला-महल्ला मिरवणूक आणि 16 ऑक्टोबर रोजी शहराच्या विविध भागातून होणारे […]