ताज्या बातम्या महाराष्ट्र

राज्य शासनाने केल्या 29 पोलीस अधिकाऱ्यांच्या नवीन नियुक्त्या

प्रमोद शेवाळे यांना विद्युत वितरण कंपनी विजय कबाडे यांना बदली बदलून घेण्यात यश निलेश मोरे यांना राज्य गुप्त वार्ता विभाग नांदेड(प्रतिनिधी)-राज्य शासनाने 29 नोव्हेंबर रोजी आयएएस अधिकाऱ्यांसह काही आयपीएस आणि काही मपोसे अधिकाऱ्यांच्या नवीन नियुक्त्या केल्या आहेत.पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची एकूण संख्या 29 आहे. त्यामध्ये बहुतेक जण नियुक्तीच्या प्रतिक्षेत होते. तर काहींना पुर्वी दिलेल्या नियुक्त्या बदलून […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

नांदेड जिल्ह्यातील आयएएस अधिकारी सौम्या शर्मा, तुकाराम मुंडे यांच्यासह 7 जणांना नवीन नियुक्त्या

नांदेड(प्रतिनिधी)-आज दि.29 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता राज्य शासनाने 7 भारतीय प्रशासनिक सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. या बदल्यांमध्ये अत्यंत नामांकित अधिकारी तुकाराम मुंडे आणि नांदेड जिल्ह्यातील देगलूरच्या सहाय्यक पोलीस अधिक्षक सौम्या शर्मा यांचाही समावेश आहे. राज्य शासनाने बदल्या केलेल्या अधिकाऱ्यांमध्ये 2006 च्या बॅचचे डॉ.व्ही.एन.सूर्यवंशी जे एम.एम.आर.डी.ए.मुंबई येथे अतिरिक्त आयुक्त होते. त्यांची नियुक्ती एक्साईज विभाग […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

मुखेड तालुक्यातील जांब गावात औरंगाबाद लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने 60 हजार रुपये लाच घेणाऱ्या दोघांना पकडले ; आज संपणार पोलीस कोठडी

नांदेड(प्रतिनिधी)-औरंगाबाद जिल्ह्याच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात जांब गावी एक सापळा रचून 60 हजार रुपये रोख रक्कम लाच म्हणून घेणाऱ्या दोघांना पकडले. हा घटनाक्रम अत्यंत रहस्यमय राहिला. बहुदा तो लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नांदेडशी जोडलेला असल्यामुळे त्यातील रहस्य कायम ठेवण्यात आले. 20 नोव्हेंबर रोजी पकडलेल्या दोन जणांना आज दि.23 नोव्हेंबरपर्यंतची पोलीस कोठडी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

लातूर जिल्हा बॉल बॕडमिंटन संघ महाराष्ट्रात प्रथम

  अहमदपूर(प्रतिनिधी)- १६ ते २१ नोव्हेंबर २०२२ दरम्यान गडचिरोली येथे संपन्न झालेल्या ६६व्या महाराष्ट्रा स्टेट बॉल बॕडमिंटन चॕम्पियनशिप २०२२ – २३ या स्पर्धेत लातूर जिल्ह्याच्या मुलांच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी करीत महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवून सुवर्ण पदकाचा मानकरी ठरला आहे. या राज्यस्पर्धेत महाराष्ट्रातील जवळपास सर्व जिल्ह्यातील संघानी सहभाग नोंदविला होता.स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी नागपूर व अकोला संघास […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

अवकाशातून रंगीत पॅरॉशुट खाली आले तर जनतेने याची माहिती जिल्हा प्रशासनाला द्यावी ; उपकरणांना हाताळू नये; माहिती देणाऱ्यांना बक्षीस मिळणार

नांदेड(प्रतिनिधी)-1 नोव्हेंबर 2022 ते 30 एप्रिल 2023 या कालावधीत टाटा इन्स्टटुट ऑफ फंडामेंटल रिसर्च सेंटर हैद्राबाद या संस्थेकडून वैज्ञानिक संशोधनासाठी आवकाशात दहा बलुन फ्लॉईटस्‌ सोडण्यात येत आहेत. या बलूनमध्ये वेगवेगळी वैज्ञानिक उपक्रमे आहेत. ठरावीक कालावधीनंतर ती वैज्ञानिक उपक्रमे मोठ्या रंगित पॅराशुटसह महाराष्ट्र राज्यातील औरंगाबाद, बीड, नांदेड, उस्मानाबाद, परभणी सांगली, सातारा, अहमदनगर, वर्धा, चंद्रपुर, गडचिरोली, नागपूर, […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

“नानक – साई” फाऊंडेशनला पंजाबचा ‘मानव सेवा पुरस्कार’ 

नांदेड (प्रतिनिधी) – येथील सामाजिक आध्यत्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत पंजाब आणि महाराष्ट्र राज्यात बंधुभाव जगवण्यात यशस्वी ठरत असलेल्या “नानक – साई” फाऊंडेशनला पंजाबच्या सहारा क्लबचा ‘मानव सेवा पुरस्कार’ नुकताच बटाला येथे समारंभ पूर्वक प्रदान करण्यात आला. पंजाब मध्ये सामाजिक क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या सहारा क्लब या संस्थेचच्या वतीने हा पुरस्कार जाहीर झाला होता. बटाला येथे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

सदगुरू डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराजांची समाधी उकरून समाजकंटकांनी अधर्म केला

नांदेड(प्रतिनिधी)-लिंगायत समाजाचे भक्तीस्थळ असलेल्या राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या समाधीची विटंबना करतांना काही समाज कंटकांनी ती समाधी खोदून काढली आणि त्यातून महाराजांच्या अस्थींसह अष्टधातूची पेटी लंपास करण्यात आली आहे. याबाबत अहमदपूर पोलीस ठाण्यात तक्रारही देण्यात आली आहे. प्राप्त झालेल्या एका निवेदनानुसार पोलीस निरिक्षक अहमदपुर, तहसीलदार अहमदपूर, पोलीस अधिक्षक लातूर, जिल्हाधिकारी लातूर, गृहमंत्री महाराष्ट्र राज्य, मुख्यमंत्री […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

नांदेडचे नुतन अपर पोलीस अधिक्षक अविनाशकुमार;अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे प्रतिक्षेत; विजय कबाडे वर्धा येथे

109 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या ; भोकरला कोणी नाही नांदेड(प्रतिनिधी)-राज्य शासनाने 109 आयपीएस, महाराष्ट्र पोलीस सेवेतील अधिकारी आणि पोलीस उपअधिक्षकापासून अपर पोलीस अधिक्षक अशी पदोन्नती प्राप्त केलेल्या अधिकाऱ्यांना नवीन नियुक्त्या दिल्या आहेत. परभणी येथील अविनाशकुमार यांना नांदेडचे अपर पोलीस अधिक्षक करण्यात आले आहे. हे आयपीएस अधिकारी आहेत. तसेच इतर अधिकाऱ्यांना सुध्दा नवीन पदस्थापना दिल्या आहेत. ज्यामध्ये […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

पोलीस भरती जाहिरातीला स्थगिती

पोलीस होण्याची स्वप्ने बाळगुन ठेवा नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस भरतीची जाहिरात पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आली आहे. हे आदेश आज 29 ऑक्टोबर 2022 रोजी पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके संजयकुमार यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आले आहे.त्यामुळे पोलीस होण्याची स्वप्ने बाळगलेल्या युवक-युवतींना आता पुन्हा वाटच पाहावी लागणार आहे. दि.27 ऑक्टोबर रोजी पोलीस महासंचालक कार्यालयाने राज्य भरातील पोलीस आयुक्त […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

महाराष्ट्र सरकार केंद्र सरकारच्या इशाऱ्यांवर राज्याला बरबाद करत आहे-नाना पटोळे

नांदेड(प्रतिनिधी)- महाराष्ट्राचे सरकार केंद्राच्या इशाऱ्यावर महाराष्ट्राला बरबाद करत आहेत आणि त्यातून महाराष्ट्रातून अनेक मोठे उद्योग गुजरात राज्यात पाठवले जात आहेत. राज्य सरकारला बरखास्त केले नाही तर कॉंगे्रस पक्ष याविरुध्द मोठे आंदोलन उभारणार असल्याची माहिती कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोळे यांनी दिली. राहुल गांधी यांच्या भारत जोडो अभियान यात्रा कार्यालयाचे उद्‌घाटन करण्यासाठी ते नांदेडला आले होते. त्यावेळी […]