ताज्या बातम्या विशेष

एटीएसने पकडलेल्या पाच जणांना आठ दिवस पोलीस कोठडी

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेडच्या एटीएस पथकाने नांदेडमधून एकच व्यक्ती ताब्यात घेतला होता. इतर चार परभणी येथून आणले होते. नांदेडमधील एक अद्याप एटीएस पथकाला भेटला नाही. न्यायालयात हजर केलेल्या पाच जणांना मुख्य न्यायदंडाधिकारी किर्ती जैन देसरडा यांनी पाच जणांना 30 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे. नांदेडच्या एटीएस पथकाने एनआयएच्या मार्गदर्शनावर काल रात्री नांदेडमधून एक युवक ताब्यात घेतला होता. परंतू […]

ताज्या बातम्या विशेष

स्थानिक गुन्हा शाखा नांदेडच्या सिंहासनाचा दावेदार कोण ?

नांदेड(प्रतिनिधी)-जीवनात सरडा आपले रंग बदलण्यासाठी प्रख्यात आहे. पण तो आपल्याकडे येणाऱ्या धोक्यासाठी आपला रंग बदलतो कारण त्याला आपले प्राण वाचवायचे असते. पण जगात माणसे संधी पाहुन रंग बदलतात. असाच प्रकारचा एक रंग नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हा शाखेच्या खुर्चीवर विराजमान होण्यासाठी सुरू आहे. कोण असेल तो दावेदार ? किंबहुना आता असलेले सिंहासन सोडण्याची त्या […]

ताज्या बातम्या विशेष

वडिलांच्या मद्यपी प्रवृत्तीला कंटाळलेल्या युवतीचे प्राण पोलिसाने वाचवले

कुंडलवाडी,(प्रतिनिधी)- एका २० वर्षीय युवतीने आपल्याला जागायचेच नाही हा प्रण घेऊन जीवन संपवण्यासाठी बाभळी पुलावर उभी असतांना एक पोलीस अंमलदाराने आपले पोलीस काम विसरून तिला आत्महत्ये पासून परावृत्त करण्यासाठी घेतलेली मेहनत नक्कीच दखल घेण्यासारखी आहे. मागील आठवड्यात कुंडलवाडी पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस रघुवीरसिंह चौहाण श्री गणेश विसर्जनाची तयारी आणि आपले कर्तव्य पाहण्यासाठी धर्माबाद ते कुंडलवाडी […]

ताज्या बातम्या विशेष

शेख याहिया शेख इसाक हाच तथाकथीत पत्रकार; शासकीय दस्तऐवजात आहे नोंद

नांदेड(प्रतिनिधी)-लोकांना तथाकथीत म्हणणाऱ्या शेख याहिया शेख इसाकला नांदेड तहसीलदारांनी दिलेल्या नोटीसचे काय झाले? खुलासा दिला होता की, नाही, नाही दिला तरी त्यावर जवळपास दोन वर्ष झाले त्यावर कारवाई का झाली नाही हा प्रश्न नव्याने समारे आला आहे. इतर लोकांनाबद्दल आपल्याकडे काही पुरावे नसतांना बातम्यांचा धंदा युट्युबच्या माध्यमातून करणाऱ्या शेख याहिया शेख इसाकने माझा महाराष्ट्र लाईव्ह […]

ताज्या बातम्या विशेष

लोकमान्य मंगल कार्यालय हे लोकमान्य सेवा ट्रस्टचे ;दिवाणी न्यायालयाचा निकाल

नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील अण्णाभाऊ साठे चौकात असलेल्या लोकमान्य मंगल कार्यालयाबाबत न्यायालयात आणलेला वाद पाचव्या सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर बी.एम.एन.देशमुख यांनी हे मंगल कार्यालय लोकमान्य सेवा ट्रस्टचे आहे असा निकाल देतांना वादाचा खर्च सुध्दा प्रतिवादींना अर्थात नांदेड टाऊन मार्केटला लावला आहे. नांदेड न्यायालयात नियमित दिवाणी खटला क्रमांक 457/2017 दाखल होता हा खटला लोकमान्य सेवा ट्रस्टचे अध्यक्ष विवेकानंद […]

ताज्या बातम्या विशेष

त्यांच्या डोळ्यात आनंदही आणि अश्रुही !

नांदेड (प्रतिनिधी) – स्वत:च्या उपजत आदिवासी ज्ञानाला जवळ करत या मुलींच्या पालकांनी मनाची घालमेल सांभाळून शाळेत घातले. शासनाच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट अंतर्गत या मुली निवासासह बारावी पर्यंत शिक्षण घेऊन स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी सिद्धही झाल्या. पुढे काय हा प्रश्न त्यांच्या समोर होता. सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प संचालक किर्तीकिरण एच. पुजार यांनी या मुलींच्या […]

ताज्या बातम्या विशेष

कर्दनकाळ पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी यांच्या नेतृत्वात अर्चित चांडक आणि नांदेड पोलीसांनी हट्याचा जुगार अड्डा उध्वस्त केला

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यासह परभणी, हिंगोली आणि लातूर जिल्ह्यात दरारा असणाऱ्या पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी यांच्या कुशल नेतृत्वात बिलोलीचे सहाय्यक पोलीस अधिक्षक अर्चित चांडक यांच्या सक्षम पुढकारात नांदेड जिल्हा पोलीस पथकाने हिंगोली जिल्ह्यातील मौजे हट्टा येथे एका जुगार अड्‌ड्यावर धाड टाकून 25 जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. या ठिकाणी 20 लाख 34 हजार 830 रुपयांचा एकूण मुद्देमाल […]

ताज्या बातम्या विशेष

शिवाजीनगर पोलीस भाजप महानगर जिल्हाध्यक्ष प्रविण सालेवर गुन्हा का दाखल करत नाहीत?

12 दिवसांपुर्वी ऍट्रॉसिटी कायद्याअंतर्गतचा अर्ज फक्त घेतला आहे नांदेड(प्रतिनिधी)-भारतीय जनता पार्टीचे महानगर जिल्हाध्यक्ष प्रविण साले यांनी वास्तव न्युज लाईव्हचे नाव वापरून दिलेल्या एका निवेदनाबद्दल वास्तव न्युज लाईव्हचे संपादक कंथक सुर्यतळ यांनी प्रविण साले विरुध्द दिलेल्या अर्जात आज 12 दिवस झाले तरी गुन्ह्याची नोंद झालेली नाही. हा अर्ज कंथक सुर्यतळ यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिला आहे. […]

ताज्या बातम्या विशेष

खाजगी मोबाईलद्वारे कसुरदार वाहन चालकांचे फोटो आता काढता येणार नाहीत

नांदेड(प्रतिनिधी)-मोटार वाहन कायद्याअंतर्गत पोलीसांना ई चालन मशिन देण्यात आली. पण पोलीस आपल्या खाजगी मोबाईलने वाहन चालकांचे फोटो काढून त्यांच्यावर ई चालनची कार्यवाही करतात. वाहतुक विभागाचे अपर पोलीस महासंचालक कुलवंत कुमार सारंगल यांनी एक आदेश जारी करून पोलीसांनी खाजगी मोबाईलचा वापर न करता ई चालन मशीनचाच वापर करून वाहन चालकांचे मोटार वाहन कायदा तोडल्यानंतरचे फोटो काढावेत […]

ताज्या बातम्या विशेष

पोलिसांचा पुत्र पोलीस नसला तरी त्याच्या अंगी पोलीस गुण उपजत असतातच

पोलीस पुत्राने 30 हजारांची बॅग पोलिसांना आणून दिली;मालकाला परत मिळाली नांदेड,(प्रतिनिधी)- पोलिसांचे पुत्र पोलीस झाले नाही तरी त्यांच्या अंगी पोलीस गुण जन्मजात असतातच असाच एक सुंदर प्रसंग आज घडला.आपल्या वडिलांच्या सेवा निवृत्ती कार्यक्रमातूनघरी परतणाऱ्या एका पोलीस पुत्राला सापडलेली 30 हजार 150 रुपयांची बॅग त्यांनी अत्यंत जलद गतीने वजिराबाद पोलिसांच्या स्वाधीन केली.काही वेळातच पोलिसांनी ती रोख […]