महाराष्ट्र

सातव्या वेतन आयोगानुसार पोलीस हवालदार ही पदोन्नतीच नाही

78 दिवसांच्या वेतनाऐवढा वार्षिक आर्थिक लाभ पोलीसांना मिळावा यासाठी प्रयत्न करणार -पोलीस महासंचालक संजय पांडे नांदेड(प्रतिनिधी)-सेवानिवृत्त पोलीस अधिकारी, अंमलदार आणि कार्यरत असणारे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांच्यासाठी माझ्यापरी मी सर्व प्रयत्न करणार असून लवकरात लवकर आपल्या सर्व मागण्या मी शासनस्तरावर मंजुर करून घेण्यासाठी कटीबध्द असल्याचे प्रतिपादन पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी केले. दि.12 ऑक्टोबर रोजी […]

क्राईम

अपर पोलीस अधिक्षक कार्यालय भोकरच्या हद्दीत स्थागुशाने लाखो रुपयांचा गुटखा पकडला

नांदेड(प्रतिनिधी)-स्थानिक गुन्हा शाखेेच्या पोलीस पथकाने भोकर अपर पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या हद्दीत एका वाहनासह 15 लाख 80 हजार रुपये किंमतीचा गुटखा पकडला आहे. हिमायतनगर गावात चौपाटी परिसर प्रसिध्द आहे. या चौपाटी परिसरात गुटखा व अन्य तंबाखू जन्य पदार्थांची विक्री होत असते. कांही दिवसांपुर्वी तंबाखू नियंत्रण पथकाने भोकर शहरात कार्यवाही करून कांही तंबाखू जन्य पदार्थ विकणाऱ्या लोकांकडून […]

नांदेड

सोमवारी सलग दुसऱ्या दिवशी सापडले पाच नवीन रुग्ण

नांदेड,(प्रतिनिधी) – आज सोमवारी ६८४ तपासणीत पाच  नवीन कोरोना बाधीत रुग्ण सापडले आहेत. आज उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या २५ आहे.कोरोना बाधेतून मुक्त होण्याची टक्केवारी ९७.०३ अशी आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ,नीलकंठ भोसीकर यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आलेल्या माहितीनुसार दिनांक १८ ऑक्टोबर रोजी  कोरोना बाधेने एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.आज पाच नवीन रुग्ण सापडले आहेत. मनपा गृह […]

क्राईम

चार आरोपींना आज शिक्षा न देता परिवेक्षाधिन कायद्यानुसार एका वर्षाच्या बंद पत्रावर मुक्तता

नांदेड(प्रतिनिधी)-एका पोक्सो प्रकरणात चार जणांना येथील पोक्सो न्यायालयाचे न्यायाधीश रविंद्र पांडे यांनी परिवेक्षाधिन अपराधी कायद्यानुसार दोन वर्षांच्या बंदपत्रावर आज मुक्तता केली आहे. त्यांनी अल्पवयीन बालिकेच्या विनयभंग केल्याचा गुन्हा न्यायालयासमक्ष सिध्द झाला नाही. पण इतर गुन्हे सिध्द झाले आहेत. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या शेजारी राहणारे धुमाळे कुटूंबिय त्यांच्यासोबत नेहमीच […]

नांदेड (ग्रामीण)

कायद्याचे ज्ञान विद्यार्थ्यांनी अवगत करावे- न्यायाधीश एम.डी .बिरहारी

अर्धापूर,(प्रतिनिधी) विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी कायद्याचे सर्वांनी ज्ञान मिळविणे गरजेचे आहे. बालहक्क कायदा, बाल कामगार कायदा, लैगिंक अत्याचार कायदा यासह अनेक कायद्याचे ज्ञान विद्यार्थ्यांनी अवगत करणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन अर्धापूर तालुका न्यायाधीश एम.डी. बिरहारी यांनी केले. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमीत्त तालुका विधी समितीच्या वतीने अर्धापूर तालुक्यातील पार्डी (म.) येथील राजाबाई विद्यालयात आयोजन करण्यात आले होते. […]

क्राईम

ऍडव्होकेट नोटरी आणि एका खाजगी माणसाविरुध्द उच्च न्यायालयाचे कार्यवाहीचे आदेश

नांदेड(प्रतिनिधी)-मुंबई उच्च न्यायालयाने एका नोटरी वकीलाने माझ्यासमक्ष अशी स्वाक्षरी कागदपत्रांना करतांना ती व्यक्ती हजरच नव्हती त्यामुळे नोटरी वकीलाला न्यायालयाचा अवमान या सदराखाली नोटीस पाठविण्यात आली आहे. याचे उत्तर 21 ऑक्टोबर रोजी द्यायचे आहे. सोबतच एका महिलेची स्वाक्षरी करणाऱ्या व्यक्तीविरुध्द उच्च न्यायालयातील न्यायमुर्ती एस.जे. कठावाला आणि न्यायमुर्ती मिलिंद जाधव यांनी कार्यवाही करण्याची सुचना केली आहे. नोटरी […]

क्राईम

पाठकगल्लीतील मारहाण प्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल

नांदेड(प्रतिनिधी)- दि.16 ऑक्टोबर रोजी जुन्या नांदेड भागातील पाठक गल्ली येथे झालेल्या मारहाणीच्या संदर्भाने दोन परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. एका गुन्ह्यात जीव घेणा हल्ला आणि दुसऱ्या गुन्ह्यात गंभीर दुखापत अशी सदरे जोडली आहेत. दि.16 ऑक्टोबर रोजी दुर्गा विसर्जन सुरू असतांना पाठक गल्लीमध्ये रात्री 9.30 वाजेच्यासुमारास दोन गटांमध्ये हाणामारी झाली. याचे कारण उसने दिलेले पैसे असे […]

क्राईम

डॉक्टरला मारहाण करून लुटले; दोन जबरी चोरी आणि तीन मोटारसायकल चोऱ्या

नांदेड(प्रतिनिधी)-कंधार तालुक्यातील राऊतखेडा ते तेलूर रस्त्यावर एक जबरी चोरी झाली आहे. बरडशेवाळा ता.हदगाव येथे एक जबरी चोरी झाली आहे. इतवारा, कुंडलवाडी आणि देगलूर येथे तीन दुचाकी गाड्यांची चोरी झाली आहे. या सर्व चोरी प्रकारांमध्ये 1 लाख 77 हजार रुपयांचा ऐवज लंपास झाला आहे. डॉ.केदारनाथ माधवराव देशमुख हे आपली चार चाकी गाडी क्रमांक एम.एच.26 ए.2147 या […]

नांदेड

समाज संघटित आणि देश अखंड राहण्यासाठी समाज एकसंघ असला पाहिजे- रमेशकुमार जी.

नांदेड(प्रतिनिधी)-राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नांदेड शहर यांच्या वतीने श्री विजयादशमी व शस्त्र पूजनाचा कार्यक्रम देवकृपा लन्स येथे सपंन झाला.यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघचालक डॉ.सुधीर कोकरे,शहर संघचालक डॉ. गोपाल राठी,प्रमुख वक्ते रमेशकुमार जी अखिल भारतीय सहसंपर्क प्रमुख,प्रुमख पाहुणे सुनील राठोड सांदिपाणी स्कूल अध्यक्ष यांची उपस्थिती होती.भरात देशाला विश्व गुरू बनण्यासाठी आपली गुलाम गिरीची मानसिकता बदलली पाहिजे, कोविड […]

नांदेड

गेले ते कावळे, राहिले ते मावळे ; भाजपचे प्रांत सदस्य चैतन्य बापू देशमुख यांचा खतगांवकरांना टोला

नांदेड (प्रतिनिधी)-  निष्ठावंतांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत पक्षाचा राजीनामा देणाऱ्या माजी खा. भास्करराव पाटील खतगावकर यांना पक्षात एंट्री केल्यानंतर लगेच डायरेक्ट प्रदेश उपाध्यक्ष पद देण्यात आले त्यावेळी निष्ठावंतांवर अन्याय झाल्याची उपरती झाली नाही आताच कशी झाली असा प्रश्न उपस्थित करत   गेले ते कावळे, राहिले ते मावळे असा टोला भाजपचे प्रांत सदस्य चैतन्य बापू देशमुख […]