नांदेड(प्रतिनिधी)-खरेदी केलेल्या जमीनीत भागिदार बनवतो म्हणून एका महिलेला डॉक्टरसह तिच्या पतीची 46 लाखांना फसवणूक करणाऱ्या तीन जणांविरुध्द किनवट पोलीसंानी गुन्हा दाखल केला आहे.
डॉ.सारिका सुरेंद्र जन्नावार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 25 सप्टेंबर 2023 ते 19 ऑगस्ट 2024 दरम्यान गोकुंदा ता.किनवट येथील मंजुषा विठ्ठलराव मुन्नरवार, गोविंद साबन्ना जेठेवाड आणि श्रीपाद अंबादास जेठेवाड या तिघांनी डॉ.सारिका यांना जमीन खरेदीमध्ये भागीदार करतो म्हणून त्यांच्याकडून आणि त्यांच्या पतीकडून एकूण 46 लाख रुपये घेतले. परंतू जमीन डॉ.सारिका जन्नावार किंवा त्यांच्या पतीच्या नावाने न करता परस्पर विक्री केली. त्यामुळे डॉ.सारिका आणि त्यांच्या पतीची फसवणूक झाली आहे. किनवट पोलीसांनी तिघांविरुध्द गुन्हा क्रमांक 192/2025 दाखल केला आहे. पोलीस उपनिरिक्षक झाडे अधिक तपास करीत आहेत.
डॉक्टर महिलेची 46 लाखांना फसवणूक
