नांदेड,(प्रतिनिधी)- उस्माननगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत कापसी ते गोळेगाव जाणाऱ्या रस्त्यावर पोलिसांनी चोरटी वाळू भरलेला एक टिप्पर पकडला आहे. त्यात एकूण चार लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार आप्पाराव दशरथ वरपडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दिनांक 18 जून रोजी सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास ते आणि त्यांचे सहकारी पोलिसांना कापशी ते गोळेगाव जाणाऱ्या रस्त्यावर गस्त करत असताना, त्यांना प्राप्त झालेल्या माहितीनुसार या रस्त्यावर असलेल्या कॅनॉल मधून चोरटी रेती वाळू काढून वाहतूक होत आहे. तेथे जाऊन तपासणी केली असता तेथे एम एस 26 एच 7218 क्रमांकाचा एक टिप्पर सापडला.त्यात असलेल्या वाळू संदर्भाने विचारणा केली असता, कोणतेही समाधानकारक उत्तर देण्यात आले नाही म्हणून उस्मान नगर पोलिसांनी संभाजी आत्माराम जाधव (30) टिप्पर चालक आणि ज्ञानेश्वर प्रकाश जाधव (35) दोघे राहणार चिंचोली तालुका लोहा यांच्याविरुद्ध गुन्हा: क्रमांक 120/2025 दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक संजय नीलपत्रेवार, पोलीस उपनिरीक्षक गजानन गाडेकर गाडेकर, पोलीस अंमलदार सुशील कुबडे, नामदेव रेजितवाड, आप्पाराव वरपडे, पवार, कांबळे यांनी ही कार्यवाही केली. कंधारच्या उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अश्विनी जगताप यांनी या कार्यवाहीसाठी उस्मान नगर पोलिसांचे कौतुक केले आहे.
More Related Articles
पत्रकार याहिया, त्याचा पूत्र आणि इतर दोघांवर जबरीचोरी, खंडणी आदी सदरांखाली गुन्हा दाखल
नांदेड(प्रतिनिधी)-युटूबवर बातम्या टाकून बदनामी करतो एवढेच नव्हे तर फिर्यादीच्या खिशातील 3 हजार रुपये बळजबरीने काढून…
अर्धापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2 लाखांपेक्षा जास्त किंमतीच्या ऐवजाची जबरी चोरी; चार चाकी वाहनातून आले होते दरोडेखोर
नांदेड(प्रतिनिधी)-अर्धापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वसमत फाटया पासून जवळ एका आमराई जवळच्या आखाड्यावर जबरी चोरी झाली…
हदगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत 7 लाख 80 हजार रुपये सापडले
हदगाव(प्रतिनिधी)-हदगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका चार चाकी गाडीला तपासण्यासाठी थांबविले असता त्यात असणारा माणुस गाडीतील…
