प्रधानमंत्री जनजातीय आबा उत्कर्ष योजनेच्या अभियानाबाबत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे आदिवासी जनतेला आवाहन  

नांदेड-प्रधानमंत्री जनजातीय आबा उत्कर्ष योजना अभियान नांदेड जिल्ह्यात राबवण्यात येत आहे. नांदेड जिल्ह्यातल्या आदिवासी बहुल तालुक्यांमध्ये हा कार्यक्रम जिल्हा प्रशासनाच्यावतीने हातात घेण्यात येत आहे. यामध्ये प्रामुख्याने आदिवासी समाजातील आरोग्य शिक्षण, पायाभूत सुविधांचा विकास यासारख्या सोयी-सुविधा देऊन आवश्यक लाभ आदिवासी नागरिकांना देण्यात येणार आहेत. त्यासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये शिबिर आयोजित केले जात आहेत. त्यामध्ये ज्या काही योजना आहेत त्यात शिक्षण विभागाच्या, आरोग्य, नविनिकरण ऊर्जा, जलशक्ती, दूरसंचार, ऊर्जा मंत्रालय यासारखे अनेक योजना आहेत. त्या आदिवासी जनेतेसाठी या शिबिराच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात येणार आहेत. यासाठी किनवट एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी जेनित चन्द्रा दोन्तुला यांनी नियोजन केले आहे. सर्व आदिवासी क्षेत्रातील आदिवासी परिसरातील जनतेनी या योजनेचा लाभ घ्यावा. यासाठी नांदेड जिल्हा प्रशासन कॅम्प मोडवर ध्येय ठेवून आदिवासी नागरिकांना लाभ देईल, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!