मुंबई :– सामाजिक न्याय विभागाच्या वतीने १० जून २०२५ रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे भव्य स्वरूपात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. या सोहळ्यात कै. सोपानराव तादलापुरकर क्रीडा मंडळ या संस्थेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार संजय शिरसाट, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे आदी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या गौरवप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष कैलास गायकवाड यांनी पुरस्कार स्वीकारला.
संस्थेने ग्रामीण भागातील युवकांसाठी क्रीडा क्षेत्रात दिलेले योगदान, व्यसनमुक्ती आणि सामाजिक परिवर्तनासाठी केलेले कार्य याची दखल घेत हा सन्मान देण्यात आला.
या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस (शरद पवार गट) गणेश तादलापुरकर हे विशेष उपस्थित होते. त्यांच्या मार्गदर्शनामुळे संस्थेला नवसंजीवनी लाभली असून, क्रीडाक्षेत्रात नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले जात आहेत.
या पुरस्कारामुळे संस्थेच्या कार्याला नवी दिशा मिळेल व नव्या पिढीला प्रेरणा मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.