नांदेड(प्रतिनिधी)-मंत्रीनगरमधील एक भाडेकरू कुलूप लावून बाहेरगाव गेल्यानंतर चोरट्यांनी संधी साधत त्या घराचे कुलूप तोडून 32 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.
अमोल नामदेवराव होनवणे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ते मंत्रीनगर येथे किरायाणे राहतात. 23 मे रोजी दुपारी 2 ते 5 या वेळेदरम्यान ते बाहेरगावी गेल्याची संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडले आणि आतून रोख रक्कम 20 हजार रुपये आणि सोन्या चांदीचे दागिणे असा एकूण 32 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. भाग्यनगर पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 295/2025 नुसार दाखल केली आहे. पोलीस अंमलदार कांबळे अधिक तपास करीत आहेत.
मंत्रीनगरात घरफोडले
