भारतीय जनता पार्टीच्या व्यभीचार नेत्यांवर गुन्हे दाखल

भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धमन्यांमध्ये रक्ताऐवजी गरम सिंदुर वाहत आहे. ते आई भारतीचे पुत्र असून देशाला कोठेच झुकू देणार नाहीत. पण त्यांच्याच पक्षाचे नेते मात्र वाकून वाकून त्यांना ठोसे लगावत आहेत. हे पाहुन पंतप्रधानांवरच दया यायची वेळ आली आहे. त्यांच्यासोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर सुध्दा दया येत आहे. सध्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भारतीय जनता पार्टीपासून दुर राहायचे ठरवले आहे. भाजपच्या सांस्कृतीक राष्ट्रवाद जो आम्ही वाचकांसमोर सादर करत आहोत. त्यावरून त्यांच्यावर हा राष्ट्रवाद निश्चित बसतो की, नाही याचा विचार वाचकांनी करायचा आहे.


कर्नाटक राज्यातील भारतीय जनता पार्टीचे आमदार मुनिरत्ना बाबतचे हे प्रकरण आहे. मागील एक वर्षापासून विशेष तपास पथक त्यांची चौकशी करत होती. आता त्यांच्यावर सामुहिक बलात्कार, महिलेचा विनयभंग, तिची प्रताडना आणि जिवे मारण्याची धमकी अशा भारतीय दंड संहितेच्या कलमांनुसार हा गुन्हा मंगळवारी दाखल झाला आहे. या एफआयआरमध्ये भाजप आमदार मुनिरत्ना, त्यांचे सहकारी वसंता, चन्ना केशवा आणि कमल एवढ्या लोकांची नावे आहेत आणि आणखी एक जण फरार आहे. त्याचे नाव फिर्यादीला माहित नाही. 40 वर्षीय महिलेने ही तक्रार दिली आहे. घटना दि.11 जून 2023 रोजीची आहे आणि हा प्रकार कर्नाटकचे आमदार मुनिरत्ना यांच्या कार्यालयात बेंगलुरू जवळच्या मिथी खैरे या गावात घडला आहे. त्या दिवशी आ.मुनिरत्नाच्या काही सहकाऱ्यांनी त्या महिलेला कारमध्ये बसवून त्यांच्या कार्यालयात नेले. तेथे मुनिरत्ना आणि त्यांच्या दुसऱ्या सहकाऱ्यांनी मिळून तिचे कपडे काढले. तिच्यासोबत सामुहिक व्यभिचार केला. तिच्या अंगावर लघवी केली आणि तिच्या शरिरात जिवघेणा व्हायरस पसरेल असे इंजेक्शन दिले. सोबतच जातीवाचक शब्दांचा वापर केला. ही घटना ऐकल्यानंतर असे वाटते ना की, याच कर्नाटकच्या विधानसभेत बसून आ.अश्लिल चित्रफित पाहत होते. असे आहेत राष्ट्रवादी आणि देशप्रेमी नेते.


उत्तर-पश्चिम बेंगलुरूच्या यशवंतपुर जवळ असलेल्या एमआरसीआर पोलीस ठाण्यात हा गुन्हा भारतीय दंड संहितेच्या कलम 376(ब), 270, 354, 506 नुसार दाखल झाला आहे. या अगोदर त्या महिलेला पटविण्याचा प्रयत्न झाला. पण तिने ऐकले नाही म्हणून तिच्याविरुध्द खोटा गुन्हा दाखल करून तिला तुरूंगात पाठविले. तुरूंगातून सुटल्यावर वसंता आणि कमल यांनी पुन्हा त्या महिलेला आमदाराकडे नेले. झाले ते झाले आता कुठे सांगितले तर तुझ्या मुलाला मारुन टाकू अशी धमकी दिली. त्यावेळेस एक माणुस पांढरा डबा घेवून आला व त्यातील इंजेक्शन मला दिले. महिलेची तब्बेत बिघडली. तिला दवाखान्यात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी सांगितले की, हा जिवघेणा व्हायरस आहे, जगणे अवघड आहे. पण ती महिला आपल्याच आत्मशक्तीने वाचली आणि मग तक्रार दिली. काय प्रकार आहे ना. वाचकांनी सुध्दा यावर गांभीर्याने विचार करायला हवा.
हा प्रकार एकच नाही अजून एक प्रकार असाच घडला. 13 मे 2025 रोजी या संदर्भाने एकदा केंद्रीय दळण-वळण मंत्री नितीन गडकरी यांचे सुध्दा आभार मानायला हवे.की त्यांनी देशासाठी मोठ-मोठे जलदगती रस्ते बनवले. परंतू एकदा त्यांनी लोकसभेत एक खंत व्यक्त केली होती. मी प्रवासाचा वेळ कमी करण्यात यशस्वी झालो. परंतू अपघात आणि त्यातील मृत्यू मला रोखता आले नाही. याबद्दल मी दु:खी आहे. चांगल्या रस्त्यांवर अत्यंत दु्रतगती वेगाने वाहनांचा प्रवास होता. परंतू त्या रस्त्यांवर गतीची मर्यादा सुनिश्चित केलेली आहे. म्हणून या नवीन महामार्गांवर असंख्य जागी कॅमेरे लावलेले आहेत. अशाच एका कॅमेऱ्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेत्याची दुसरे कृष्णकृत्य कैद झाले. कॅमेऱ्यात कैद झालेली घटना सामाजिक संकेतस्थळांवर व्हायरल झाली. दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे वर मंदसोर जिल्हा आहे. या जिल्ह्यातील बनीनिवास गावचे भारतीय जनता पार्टीचे नेते मनोहरलाल भाकड आहेत. ते एका पांढऱ्या गाडीतून कॅमेऱ्यासमोर उतरले. तेंव्हा त्यांच्यासमोर महिला उतरली. महिला पुर्णपणे विवस्त्र होती. त्यानंतर त्यांनी रस्त्यावर उभे राहुन अभद्र काम सुरू केले आणि त्यांच्या दुर्देवाने हा घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. मंदसोर जिल्ह्यातील लोकांनी ही व्हिडीओचित्र पाहिल्यानंतर आपले नेते मनोहरलाल धाकड यांना ओळखले. त्यांच्या गाडीचा क्रमांक व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसतो आहे. ती गाडी मनोहरलाल धाकड यांच्याच नावाने नोंदणीकृत आहे. वाचकांनो हा चारआणे कमी असल्याचा प्रकार नाही काय? आणि अशा अवस्थेतील लोकांना खरे तर मानसोपचार तज्ञाकडे उपचार करायला हवा. काय हैवानीयत आहे ही की रात्रीच्यावेळेस रस्त्यावर उभे राहुन केलेले हे कृत्य म्हणजे हा सत्तेचा माज असेल ना. मंदसोर जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष राजीव दिक्षीत यांनी सांगितले की, अशा लोकांची पक्षात गरज नाही. याहीपेक्षा मोठा प्रश्न आहे की, असे व्यक्ती राष्ट्रवादी आणि देशप्रेमी असलेल्या आणि सांस्कृतीक वारसा असलेल्या, वसुधैव कुटूंबकम अशी खोटी वल्गना करणाऱ्या राजकीय पक्षात आलेच कसे याचे उत्तर सुध्दा राजीव दिक्षीत यांनी द्यायला हवे. रतलाम पोलीस परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरिक्षक मनोजकुमारसिंह यांनी सांगितले आहे की, दु्रतगती मार्गावरील हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यासंदर्भाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!