नांदेड – राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास व अपारंपारिक ऊर्जा मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे हे रविवार 25 व सोमवार 26 मे 2025 रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
रविवार 25 मे 2025 रोजी सकाळी 6.30 वा. छत्रपती संभाजीनगर येथून वाहनाने देगलूर जि. नांदेडकडे प्रयाण. दुपारी 12 वा. शासकीय विश्रामगृह, नांदेड जि. नांदेड येथे आगमन व राखीव.
सोमवार 26 मे 2025 रोजी दुपारी 1 वा. शासकीय विश्रामगृह, नांदेड जि. नांदेड येथून कुसुम सभागृह , व्हीआयपी रोड, नांदेडकडे प्रयाण. दुपारी 1.15 वा. कुसुम सभागृह, व्हीआयपी रोड, नांदेड येथे आगमन व केंद्रीय गृहमंत्री मा. ना. श्री. अमितभाई शाह यांच्या उपस्थित होणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या मराठवाडा विभागीय संवाद बैठकीस उपस्थिती. सायं. 4.15 वा. केंद्रीय गृहमंत्री मा.ना. श्री.अमितभाई शाह यांच्या उपस्थित होणाऱ्या जाहीर सभेस उपस्थिती. स्थळ: नवा मोंढा, नांदेड . सोईनुसार नांदेड येथून छत्रपती संभाजीनगर कडे वाहनाने प्रयाण.