राजीव गांधी जीवनदायी मोफत आरोग्य योजनेतही रुग्णांची आर्थिक पिळवणूक
नांदेड- राज्यातील गरीब, दीनदुबळ्या लोकांना मोफत औषध उपचार मिळवा या उद्देशाने सरकारने राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सुरू केली.पण राजीव गांधी जीवनदायी मोफत आरोग्य योजनेतही नांदेड येथे रुग्णांची आर्थिक पिळवणूक होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.ज्यात जीवनदायी योजनेशी संलग्न असणाऱ्या रुग्णालयाकडून रुग्णांची आर्थिक लूट होत असल्याची घटना उघड झाली आहे.
दरम्यान नांदेड शहरातील डॉक्टर लाइन परिसरातील नंदीग्राम रुग्णालयाशी संलग्न असणाऱ्या विठाई रुग्णालयातील अस्थिरोग तज्ञ असणाऱ्या डॉक्टर प्रदीप संगनोड यांनी शस्त्रक्रिया करण्यासाठी पैशांची मागणी केली.ज्यात अपघातात जखमी होऊन हाडाला गंभीर जखम झालेली रुग्ण ज्योती कांचन खंदारे यांनी जीवनदायी आरोग्य योजनेच्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करत विठाई रुग्णालयात ऍडमिट करण्यात आले. पण शस्त्रक्रिया करण्या अगोदर पंधरा हजार रुपया भरा तेव्हांच शस्त्रक्रिया केली जाईल असे तेथील अस्थिरोग तज्ञ डॉ.प्रदीप संगनोड यांनी सांगितले. या मोफत योजनेचे शासनाच्यावतीने नांदेड जिल्ह्यातील समन्वयक डॉ.दीपेश कुमार द्वारकादास शर्मा हे आहेत.
संबंधीत व्हिडीओ….