नांदेड–सध्याच्या ऑनलाईनच्या आणि फास्टफुडच्या जमाण्यात माणूस आपली माणूसकी, प्रेम व आपूलकी विसरून चालला आहे. एकमेकांपासून दूर चालला आहे. नाती तुटण्यास आतूर होत आहेत. त्यातच एक मृगजळ म्हणजे 30 वर्षानंतर काही मित्र-मैत्रिणी एकत्र येऊन जुण्या आठवणींना उजाळा देण्याचे काम करून आपला आयुष्याचा भावी प्रवास सुखकर होण्याचा प्रयत्न करतात. औचित्य होते, महात्मा फुले हायस्कुल विजयनगर, नांदेड येथील सन 1995 च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा.
महात्मा फुले हायस्कुल विजयनगर, नांदेड येथून इयत्ता 10 वी उत्तीर्ण झालेल्या 1995 च्या बॅचचे तब्बल 25 विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन नांदेड येथील शासकीय विश्रामगृहात दिनांक-18/05/2025 रोजी एक आगळावेगळा भावनिक देवाणघेवाणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ज्याला आजच्या भाषेत गेट टूगेदर म्हणतात.
सदर गेट टूगेदरची संकल्पना श्याम हंबर्डे यांनी मांडली होती. त्याला प्रत्यक्षात आणण्याचे काम प्रविण खंदारे व हनूमंत पोकले यांनी केले. परंतु 30 वर्षे जूण्या मित्र-मैत्रीणींना एकत्र आणण्याचे काम आसावरी हिने केले. तिच्या संकल्पनेतूनच हा व्हॉटसअप ग्रुप निर्माण झाला आणि 30 वर्षे जूणे मित्र एकत्र आले.
या गेट टूगेदर कार्यक्रमासाठी आपल्या बिझी शेडयूल मधून खास वेळ काढून सर्वजण एकत्र येऊन तब्बल 7 तास त्यांनी एकत्र घालविला आणि आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. त्यात बहर म्हणजे दिपा आणि तिच्या पतीचे मंत्रमुग्ध करणारे गाणे आणि दुपारचे भरपेट जेवण.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन हनूमंत पोकले याने केले. 30 वर्षापूर्वीच्या प्रत्येक विद्यार्थ्याचे वैशिष्टय सांगत त्यांना मंचावर मनोगत व्यक्त करण्यासाठी त्याने बोलविले. शालेय जिवनात व आताही न बोलणारे सर्वजण याठिकाणी थोडक्यात का होईना पण प्रकट झाले. त्यामध्ये सुभाष असो की वैशाली, संदीप असो की शिवकण्या सर्वांनी आपले मनोगत व शालेय जिवनातील आठवणींना उजाळा दिला. आज या 25 जणांपैकी कुणी डॉक्टर, कुणी इंजिनिअर, कुणी वकील, कुणी खाजगी व्यावसायिक, खाजगी नोकरी करणारे, कुणी राजकीय क्षेत्रात तसेच एक जण तर चक्क् न्यायाधिश म्हणून कार्यरत आहे. सुनिल भोसले हा सध्या नेवासा येथे न्यायाधिश पदावर कार्यरत असून त्याने त्या पदाचे सर्व प्रोटोकॉल बाजूला ठेवून मित्रांना भेटण्यासाठी येथे आला होता. हिच तर खरी मैत्रीची व्याख्या आहे हे त्याने दाखवून दिले.
डॉ.चंद्रशेखर वाघमारे हा सध्या नांदेड येथेच प्रायवेट प्रॅक्टीस करत असून त्याने शालेय जिवनातील प्रत्येक शिक्षकांना आठवण करुन त्यांचे गमती जमती सांगितल्या. तसेच त्यांनी आपल्याला आपल्या आयुष्यात कोणते मार्गदर्शन केले त्यामुळे आपल्याला काय फायदा झाला हे सांगितले. यावेळी सर्वजण भावूक झालेले दिसून आले.
डॉ.सविता व डॉ.सुमेधा आणि प्राची यांनी त्यांचे मंजूळ आवाजात गाणे व कविता सादर केल्या. त्यामुळे कार्यक्रमास वेगळीच लय प्राप्त झालेली आहे. तर संगिताने आपल्या उखाण्याने श्याम ला आईस्क्रीमची चांगली आठवण करून दिली.तर गौतम ने राजकीय क्षेत्रात त्याचे पुढील काय काम आहे हे सांगितले.
कार्यक्रमात पुढे डॉ.राजहंस, शेखर, गौतम, अभिजित, संदीप, महेश, अविनाश, विजय, उमेश, गजानर, योगेश्वरी, वैशाली, शिल्पा, संगिता, आदि तब्बल 25 जण या गेट टूगेदरसाठी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली. त्यानंतर मित्र नितीन पटवारी व मा.श्रॉफ मॅडम यांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली, तर कार्यक्रमाचा शेवट झिंगाट गाण्यावर नाचून करण्यात आला.
शेवटी सर्वांनी यापुढील गेट टूगेदर शालेय जीवनातील सर्व शिक्षकांसमवेत लवकरच पुर्ण करण्याच्या मानसेने सांगता केली व आजच्या आठवणींची शिदोरी सोबत घेऊन सर्व जण जड अंतकरणाने आप आपल्या घराकडे निघाले.