नांदेड (प्रतिनिधी)- एका तासापूर्वी वसरणी भागात गोळीबार झाला असून त्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आणि दुसरा जखमी अवस्थेत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
आज दि. 11 मे रोजी दुपारी 2 ते 2.30 वाजेदरम्यान वसरणी भागातील पाण्याच्या टाकीखाली गोळीबार झाला. यामध्ये परवेज शेख या व्यक्तीचा मृत्यू झाला आणि दुसरा तेजासिंघ उर्फ बादल बावरी हा जखमी अवस्थेत सध्या उपचार घेत आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आशु पाटील नावाच्या व्यक्तीने हा गोळीबार केला आहे. गोळीबाराची माहिती मिळताच अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. घडलेली घटना आणि झालेला प्रकार याचा सविस्तर अभ्यास करत आहेत.