पाठीसिंघांच्या पाठ मानधनात वाढ करण्याची मागणी 

 

नांदेड,(प्रतिनिधी)-गुरुद्वारा तखत सचखंड हजुरसाहिब अंतर्गत श्रद्धाभावाने आयोजित होणाऱ्या श्री गुरु ग्रंथसाहिब यांच्या विविध शैलींच्या पाठ मानधनात वाढ करण्याची मागणी येथील हजुरी पाठी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. वरील विषयी हजुरी पाठी संघटनेतर्फे शुक्रवार, दि. 4 एप्रिल रोजी गुरुद्वारा सचखंड बोर्डाचे प्रशासक डॉ. विजय सतबीरसिंघ यांना निवेदन पाठविण्यात आले. या निवेदनावर हजुरी पाठी संघटनेचे अध्यक्ष स. दलजीतसिंघ बिशनसिंघ, हजुरी पाठी संघटनेचे उपाध्यक्ष स. प्रदीपसिंघ रागी, संघटनेचे सचिव स. जगदीपसिंघ नंबरदार यांच्या स्वाक्षऱ्याआहेत. निवेदनात नमूद केले गेले आहे की, गुरुद्वारा तखत सचखंड श्री हजुर साहिब येथे श्री अखंड पाठ, सप्ताह पाठ, जपजी साहिबचे पाठ, श्री दशम ग्रन्थ साहिबचे पाठ व जाप साहेबचे पाठ केले जाते. गुरुद्वारा बोर्डातर्फे पाठ करण्याचा मोबदला मानधन स्वरुपात दिला जातो आणी इतर ठिकाणाच्या तुलनेत ते मानधन खूप कमी आहे. गुरुद्वारात दोन तासांसाठी 200 /- रूपये दिले जाते. पण अन्य काही ठिकाणी दोन तासांसाठी 350 ते 400 रू दिले जात आहे. महागाईच्या काळात पाठीसिंघ यांना मिळणारे मानधन खूप कमी आहे. तेव्हा मानधनात वाढ करण्यात यावी अशी मागणी हजुरी पाठी संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!