नांदेड(प्रतिनिधी)-नांदेडच्या पोलीस अधिक्षकांनी सर्वसाधारण बदल्या 2025 पुर्वी पोलीस अधिक्षक कार्यालयात विनंती अर्ज करू नये, भेटण्यास येवू नये नसता संबंधीत पोलीसांच्या घटक प्रमुखाविरुध्द कार्यवाही होईल असा बिनतारी संदेश जारी केला आहे.
दि.10 फेबु्रवारी रोजी जारी झालेला बिनतारी संदेश असा आहे की, जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी आणि सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी यांना पाठविला आहे. त्यात पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी आणि उपविभागीय अधिकारी यांच्या अधिनस्त असलेल्या पोलीस अंमलदारांनी सर्वसाधारण बदल्या 2025 पुर्वी बदली संबंधाने कोणताही अर्ज करू नये, किंवा प्रत्यक्ष भेटण्यास येवू नये याची नोंद घेण्यास सांगितले आहे. पोलीस अंमलदार बदलीसाठी पोलीस अधिक्षक कार्यालयास उपस्थित राहिल्यास घटकप्रमुखाविरुध्द कार्यवाही करण्यात येईल याची दक्षता घेण्यास सांगितले आहे. यापुर्वीचे सर्व बदलीचे विनंती अर्ज दप्तरी दाखल करण्यात आलेले आहेत. सर्वसाधारण बदल्या 2025 पुर्वी कोणाच्या बदल्या होणार नाहीत असे यात लिहिले आहे. असे असले तरी अनेक जणांना सलग्न या सदराखाली विविध ठिकाणी पाठविण्यात आले आहे हे सुध्दा सत्य आहे.
सर्वसाधारण बदल्या 2025 पुर्वी पोलीस अंमलदार पोलीस अधिक्षक कार्यालयात उपस्थित राहिले तर घटप्रमुखांविरुध्द कार्यवाही होणार
