नांदेड(प्रतिनिधी)-मौजे बिळाली ता.मुखेड येथे एक घरफोडून चोरट्यांनी 2 लाख 80 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. शंकरनगरी फत्तेजंगपुर येथे एक घरफोडून चोरट्यांनी 70 हजार रुपयांचा ऐवज चोरला आहे.
राजेश भाऊराव कदम यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 5-6 फेबु्रवारीच्या रात्री ते आपल्या घरात कुटूंबासह झोपले असतांना कोणी तरी चोरट्यांनी त्यांच्या घराच्या गेटचे कुलूप तोडून घरामध्ये प्रवेश केला आणि घरातील खोलीचे कुलूप तोडून त्यातील फर्निचर ड्रॉपमध्ये ठेवलेला ऐवज रोख रक्कम आणि सोन्या-चांदीचे दागिणे असा एकूण 2 लाख 80 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. मुखेड पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 22/2025 नुसार दाखल केली आहे. पोलीस उपनिरिक्षक चव्हाण अधिक तपास करीत आहेत.
शंकरनगरी फत्तेजंगपूर येथील नागेश देवजी अलगुंडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 2 फेबु्रवारीच्या मध्यरात्रीनंतर 3 वाजेच्यासुमारास त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील सोन्या-चांदीचे दागिणे आणि रोख रक्कम असा एकूण 70 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. नांदेड ग्रामीण पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 126/2025 नुसार दाखल केली आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस अंमलदार पांचाळ करीत आहेत.
मुखेड तालुक्यात एक घरफोडून 2 लाख 80 हजारांचा ऐवज लंपास ; शंकरनगरीमध्ये 70 हजारांची चोरी
