नांदेड(प्रतिनिधी)-माता रमाई आंबेडकर यांच्या 127 व्या जन्मोत्सव निमित्त डॉ.आंबेडकरनगर येथील वंचित बहुजन आघाडेचे युवा नेते राहुल सोनसळे यांच्या नेतृत्वात युवक-युवती, महिला-पुरूष आदींनी माता रमाई आंबेडकर जन्मोत्सव साजरा करतांना मिरवणूक काढून जल्लोष साजरा केला.
आज माता रमाई आंबेडकर यांच्या जन्मोत्सवानिमित्त आज डॉ.आंबेडकरनगर येथून निघालेली मिरवणूक आकर्षक होती. छोट-छोट्या बालिका माता रमाईच्या स्वरुपात दिसत होत्या. लहान बालिकांचे लेझीम पथक या मिरवणुकीत सहभागी झाले होते. एक रथ तयार करण्यात आला होता. या रथात महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई आंबेडकर यांचे स्वरुप बनून बसलेले बालक आणि बालिका आकर्षक दिसत होते. युवकांनी माता रमाईच्या गाण्यांवर जल्लोष करत ही मिरवणूक निघाली.

अत्यंत गाजत-वाजत निघालेली ही मिरवणूक प्रथम महात्मा ज्योतीबा फुले आणि क्रांती ज्योत सावित्रीबाई फुले यांच्या पुतळयाजवळ पोहचले. तेथे या दोघांना अभिवादन करून मिरवणूक हळूहळू शिवाजीनगर, वजिराबाद चौक मार्गे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर समाप्त झाली.या मिरवणूक सार्वजनिक भिमजयंती मंडळ त्रिरत्न विहार डॉ.आंबेडकरनगर नांदेड येथील सर्व पदाधिकारी सहभागी झाले होते.