नांदेड(प्रतिनिधी)-महावितरणच्या खांबावरील तार खाली लोंबकळत असल्याने त्या तारेतील उष्णता ऊसाने सोसली आणि आग लागली. जवळपास 20 ते 25 एकर शेतातमध्ये तयार असलेले ऊसाचे पिक जळून खाक झाले आहे. जवळपास 11 शेतकऱ्यांचे ऊस जळून गेले आहेत.
मुदखेड तालुक्यातील शिखाची वाडी या गावात असलेल्या गट क्रमांक 154 मधील शेतकरी लक्ष्मण पुंडलिक खानसोळे, संजय खानसोळे, दिगंबर खानसोळे, दत्तराम खानसोळे, शिवाजी खानसोळे अशा 11 शेतकऱ्यांच्या एकाच गटातील शेतीमध्ये 20 ते 25 एकर ऊसामध्ये शॉर्टसर्कीटने आग लागली आहे आणि ऊस जळून खाक झाला आहे. हा प्रकार वीज वितरण कंपनीची उच्च दाब वाहिनीची तार खाली ऊसाच्या उंचीपर्यंत लोंबकळत होती आणि त्यातील उष्णता ऊसाने घेतली आणि ऊसाला आग लागली. या लोंबकळत्या तारेखा ईलाज करा असे निवेदन महावितरण कार्यालयास दिल्यानंतर सुध्दा कंपनीने ती दुरूस्ती केलेली नाही आणि आज त्याच्या परिणामात 11 शेतकऱ्यांचा ऊस खाक झाला आहे.
आसपासच्या शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याच्या उपयोग करून आग विझविण्याचा प्रयत्न केला. पण आग काही आटोक्यात आली नाही. आगीने पुर्ण ऊसाची वाट लावून टाकली. ही आग शॉर्टसर्कीटमुळेच लागली आहे आणि त्याची पुर्णपणे नुकसानभरपाई मिळावी म्हणून शेतकरी मागणी करणार आहेत.
व्हिडिओ-1
व्हिडिओ-2