नांदेड(प्रतिनिधी)-उद्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आभार यात्रा दौऱ्यावर नांदेड येथे येत आहेत. त्यांच्या या दौऱ्याची प्रसिध्दी करतांना लावलेल्या बॅनर्सवर महायुतीचा महाविजय असे शब्द लिहिले आहेत. पण महायुतीच्या एकाही नेत्याचा फोटो या बॅनरवर नाही. काय घ्यावे या बॅनरमधून असा प्रश्न जनता हे बॅनर पाहुन चर्चा करत आहे.
महाराष्ट्रातील जनतेने भरभरून दिलेल्या आशिर्वादाबद्दल आभार यात्रा या नावाखाली नांदेड शहरात असंख्य बॅनर लागले आहेत. या बॅनरवर एकनाथ शिंदे यांचा एक हात जोडून एक फोटो आहे. त्यांच्या उजवीकडे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि आदरणीय आनंद दिघे यांचे फोटो आहेत. त्याखाली कार्यक्रमाचे स्थळ लिहिलेले आहे आणि उजवीकडे आणि डावीकडे एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांचे फोटो आहेत.
शहरभर लागलेल्या या बॅनरची चर्चा जिल्हाभर सुरू झाली आहे. महायुतीचा महाविजय असेल तर नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, अमित शाह, अजित पवार, या नेत्यांचे फोटो महायुतीच्या महाविजयात का नाहीत अशी चर्चा नागरीक करत आहेत. काही बातम्या छापून आल्या आहेत. त्यामध्ये मोठ्या संख्येने सभेला उपस्थित राहा असे आवाहन करण्यात आले आहे. ज्या प्रमाणे भारतीय जनता पार्टी लोकांचा वापर करते आणि वापर संपल्यावर त्यांच्याशी नाते ठेवत नाही असाच हा प्रकार घडला आहे काय अशी चर्चा होत आहे. दुसरीकडे काका पुतणे एकत्र होणार आहेत आणि त्यांच्यातील एक केंद्रीय मंत्री होणार आहेत असे विश्लेषण येत आहेत. केंद्राच्या सत्तेतून नितीशकुमार आणि चंद्राबाबु नायडू यांना वेगळे काढले जाणार आहे आणि त्यांची जागा एनसीपीचे शरद पवार गटाचे 9 खासदार घेणार आहेत असे विश्लेषण सुरू झाले आहेत. त्यातलाच हा काही परिणाम आहे काय अशी चर्चा नांदेड जिल्ह्यातील नागरीक करीत आहेत.
महायुतीच्या महाविजय बॅनरमधून महायुतीचे नेते गायब
