नांदेड(प्रतिनिधी)-श्री क्षत्रीय समाज राजपूत यांचा 32 वा सामुहिक मेळावा आज खुशालसिंह नगर येथे सायंकाळी साजरा होणार आहे. या सामुहिक विवाह मेळाव्यात 20 जोडप्यांचे विवाह होणार आहेत. आज सकाळी या 20 नवरदेवांची वरात रेणुका देवी मंदिरासमोरून निघाली आणि गाजतवाजत खुशालसिंहनगर येथे पोहचली.
विवाहत होणारा खर्च कमी करण्यासाठी सामुदायिक विवाह मेळाव्यांची परंपरा सुरू झाली. श्री क्षत्रीय समाज राजपुत यांचा आज 32 वा सामुहिक विवाह मेळावा आहे. या मेळाव्यात अनेक संत-महंत, आमदार, खासदार सहभागी होणार आहेत.
या मेळाव्याच्या कार्यक्रमाप्रमाणे आज सकाळी 9 वाजता 20 नवरदेवांची वरात श्री रेणुकादेवी मंदिरासमोरून वाजत गाजत सुरू झाली ती खुशालसिंहनगर महाराणा प्रताप चौक येथे पोहचली. दुपारी 1 वाजता हवन आणि भवरी विधी होणार आहे. सायंकाळी 6.35 वाजता अक्षदा होणार आहेत. त्यानंतर उपस्थितांसाठी भोजनाची सोय करण्यात आली आहे. श्री क्षत्रीय समाज यांच्यावतीने प्रत्येक कार्यक्रमांसाठी वेगवेगळ्या समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. यंदाच्या श्री क्षत्रीय समाज राजपूत या संघटनेवर अध्यक्ष राजेशसिंह अग्नीवंशी, सचिव गणेशसिंह कौंडल्य, सहसचिव बजरंगसिंह परिहार, कोषाध्यक्ष रविंद्रसिंह रघुवंशी, सदस्य खुशालसिंह कौशीक, सरदारसिंह परमार, कालूसिंह कौशीक, हनुमानसिंह गहलोत, कैनुरसिंह निकुंभ, परसरामसिंह विदेह, सुनिलसिंह परमार, उमेशसिंह परमार, विक्रमसिंह काती हे कार्यरत आहेत.
श्री क्षत्रीय समाज राजपूत यांचा आज 32 वा सामुहिक विवाह मेळावा ; 20 जोडपे विवाहबध्द होणार
