29 जानेवारी रोजी मौनीआमावस्येच्या दिवशी कुंभमेळ्यात झालेली चेंगराचेंगरी एकच नव्हती. तर त्याच दिवशी दुसऱ्या ठिकाणी सुध्दा चेंगराचेंगरी झाली होती आणि तेथे सुध्दा पाच लोकांचा जिव गेला होता. का लपवत असेल सरकार. 1954 मध्ये पंडीत जवाहरलाल नेहरु यांच्या कार्यकाळात झालेल्या चेंगराचेंगरीला त्यांच्या मृत्यूनंतर 64 वर्ष लपविण्यात आले असे दिल्लीतील एका मतदान मागण्याच्या रॅलीत सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठे रहस्य जनतेसमोर उघड केले. पण हे सांगत असतांना पंडीत जवाहरलाल नेहरु यांनी त्यावेळेस लोकसभेमध्ये मी या घटनेची जबाबदारी घेत आहे हे सुध्दा सांगितले होते. हे सांगायला मात्र मोदींनी जाणून बुजून टाळले. सरकारपेक्षा जास्त सरकारला सावरण्याचा धंदा मिडीयाने सुरू केला. पण हे करत असतांना आपल्या बद्दल लोकांच्या मनात काय भावना तयार होत आहेत. याची जाण त्या पत्रकारांनी ठेवायला हवी. आज मृत्यूचा आकडा 78 असल्याचे 4 पीएमने प्रमाणासह दाखवले. तरी पण शासनस्तरावर 30 जणांचा मृत्यू झालेला आहे. प्रेतांच्या ढिगाऱ्यांना कार्पेटखाली लपविण्याचा हा प्रकार आहे.
29 जानेवारीच्या मौनीआमास्येच्या घटनेनंतर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले. एकीकडे दिल्लीमध्ये निवडणुकीची रॅली करतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1954 मध्ये झालेला कुंभमेळ्यातील प्रकार अत्यंत रहस्यमयरित्या जनतेसमोर उघड करतांना सांगितले की, नेहरुची बेअबु्र होवू नये म्हणून 60 वर्ष हे लपविण्यात आले. पण हे सांगत असतांना पंडीत जवाहरलाल नेहरु यांनी ती कुंभमेळ्यातील घटना ही माझी जबाबदारी आहे असे लोकसभेत सांगितले होते. हे न सांगण्याचे काय रहस्य मोदींकडे आहे हे त्यांनाच माहित. मौनीआमावस्येला दुसऱ्या एका जागीपण चेंगराचेंगरी झाली होती. त्यात सुध्दा 5 लोकांचा मृत्यू झाला होता.
आपल्यामध्ये ताकत नाही तर का एक वर्षापासून हलगी वाजवत कुंभमेळ्यात या कुंभमेळ्यात या अशी ओरड केली. सर्वसामान्यपणे ज्या प्रवासाचा विमान तिकिट 4 ते 5 हजार रुपये होते. ते या कुंभमेळ्यात 25 ते 30 हजार रुपये झाले. विमानातून आले म्हणजे त्यांना काही विशेष सुविधा मिळाल्या नाहीत. 20-20 किलो मिटर पायी चालून स्नानाला जावे लागत होते. रेल्वे, बस आणि आपल्या चार चाकी गाड्यांनी आलेल्यांची अवस्था तर अत्यंत दुर्देवी. महाराष्ट्रातील एक मुलगा सांगत होता. चेंगराचेंगरीमध्ये माझ्या आईच्या अंगावरील कपडे फाटले, ती नागवी झाली. तेंव्हा पोलीस त्याला सांगत होते आता झाली तर झाली तशीच अंघोळ करायला सांग आणि परत जा. परत कसे जाणार, पैसे पण हरवले आहेत. कोण दाखवेल याच्यासाठी मानवता. उगीचच व्हीव्हीआयपी लोकांसाठी मोकळी सोय आणि सर्वसामान्य माणसासाठी अत्यंत छोट्या रस्त्याची सोय ती सुध्दा दुतर्फा केल्यामुळेच ही घटना घडली. आता उत्तर प्रदेश सरकारने 4 फेबु्रवारीपर्यंत व्हीव्हीआयपी स्नान बंद केले आहे. पण आता करून काय फायदा. घटना तर घडली आणि 5 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहेत. त्या दिवशी पुन्हा हीच व्हीव्हीआयपी सोय सुरू होईल. कारण त्याच दिवशी अर्थात 5 फेबु्रवारी रोजी दिल्ली विधानसभेचे मतदान आहे आणि मोदी कुंभमेळ्यात त्रिवेणी संगमात कशी डुबकी मारत आहेत. हे त्या भिकारचोट पत्रकारांना दिवसभर दाखवायचे आहे. अर्थात दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीवर त्याचा परिणाम व्हावा. हा त्या मागचा मुळ हेतू आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जनतेच्या पैशातून उधळण करत हेलीकॉप्टरमध्ये बसून नागासाधूंवर पुष्पवृष्टी केली. त्याचेही भरपूर विस्ताराने विवेचन करतांना गोदी मिडीयाने दिवस घालवला. काय योगदान आहे नागासाधूंचे भारताच्या प्रगतीत, सर्वसामान्य जनतेच्या भल्यासाठी.तरी पण त्यांच्यावर पुष्पवृष्टी आणि मरण पावलेल्या लोकांना मालवाहतुक गाडीतून त्यांची प्रेत टाकत होते. मरण पावलेल्या लोकांच्या एकाही नातेवाईकाला बोलू दिले नाही, अनेक प्रेते बिना श्वविच्छेदनाच्या परत पाठवली आणि प्रेताच्या गाड्या अत्यंत जलदगतीने खऱ्या पत्रकारांपासून दुर केल्या. आजही उत्तर प्रदेश प्रशासन 30 लोकांचा मृत्यू सांगत आहे आणि आजच आपले वृत्तप्रसिध्द करतांना 4 पीएमने प्र्रेतावर लावलेला 78 हा आकडा दाखवला आहे. सध्या 2014 नंतर भारतीय जनता मुर्दाड झाली आहे आणि त्यामुळे सर्व सहन करत आहे. घटनेनंतर जवळपास 40 तासांनी योगीजी कॅमेऱ्यासमोर रडून सांगत होते. आपण महंत आहात योगीजी आणि आपले रडू पचण्यासारखे नाही. ते रडणे खोटे नसेल परंतू रडण्यापेक्षा तुमची जबाबदारी मोठी आहे आणि त्या जबाबदारीचे वहन तुम्हाला करता आले नाही. तुमच्याच राज्याच्या नारायण दत्त तिवारी या मुख्यमंत्र्याने आपल्या काळात व्हीव्हीआयपी ही सोयच बंद केली होती. 2013 मध्ये झालेल्या कुंभमेळ्यात त्या कुंभमेळ्याचे प्रमुख अखिलेश यादव यांच्या मंत्रीमंडळातील मंत्री आझम खान हे होते. त्याही वेळेस झालेल्या दुर्घटनेनंतर त्यांनी आपल्या मंत्री पदाचा राजीनामा दिला होता. 2008 मध्ये मुंबई हल्ला झाला तेंव्हा पत्रकार हे गोदी मिडीया नव्हते. त्या पत्रकारांनी तत्कालीन गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या कपडी बदलीला टार्गेट केले त्यांनाही राजीनामा द्यावा लागला होता. 2013 मध्ये मंत्री असलेल्या ए राजा आणि कलीमोनी या दोन्ही भावा-बहिणींना आरोपानंतर जेलमध्ये जावे लागले होते. काही दिवसांपुर्वीच सर्बियामध्ये रेल्वे दुर्घटना झाली आणि ती दुर्घटना भ्रष्टाचारामुळे घडली असा आवाज एका छोट्या गटाने उठविला आणि त्यानंतर संपुर्ण देशाची जनता रस्त्यावर आली आणि पंतप्रधानांना राजीनामा द्यावा लागला होता. पोर्तुगालमध्ये एकदा भारतीय प्रवासी महिलेला गर्भवती अवस्थेत एका दवाखान्यातून दुसऱ्या दवाखान्यात नेत असतांना तिला हृदयविकाराचा झटका आला आणि तिचा मृत्यू झाला होता. त्यावेळी पोर्तुगीज जनतेने तेथील आरोग्य मंत्र्यांना राजीनामा द्यायला भाग पाडले होते.
सन 2014 नंतर भारतात सुरू असलेले राजकारण यामध्ये राजीनामा हा शब्द बहुदा ईतिहास जमा झाला आहे. अनेक आरोप होत असतांना फक्त पंडीत जवाहरलाल नेहरुंचे नाव घेवून त्यांनी काय घोटाळे गेले हे सांगण्यातच सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचा वेळ खर्च होत आहे आणि पंडीत नेहरुवरील आरोप बरोबर आहेत. हे सांगायला रुबीका लियाकत सारख्या अनेक पत्रकार भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या पायखालची वाळू म्हणजे आपल्यासाठी मोठी संपत्ती आहे असे समजून भारतीय जनता पार्टीची अथवा सरकारची बाजू मांडण्यातच धन्यता मांडत आहेत.कॉंगे्रस खा.मल्लीकार्जुन खरगे यांनी कुंभमेळ्यात स्नान केल्यानंतर गरीबी दुर होते काय? असा प्रश्न उपस्थित केला होता. यावर नरेंद्र मोदी यांच्या पायावर डोके ठेवणारे पत्रकार एकत्र आले आणि त्यांनी जवळपास 40 वेळेस या विषयावर चर्चा घडविल्या. परंतू कुंभमेळ्यात घडलेल्या घटनेनंतर या पत्रकारांना त्या विषयावर चर्चा करायला लाज वाटली. एक सुध्दा चर्चा त्यासाठी घडलेली नाही. कुंभमेळ्यात पडलेल्या मुडद्यांवर कार्पेट टाकून त्यांना दाबवले जाईल असेच चित्र आज दिसत आहे.
सोर्स: 4 पीएम आणि लोकहित इंडिया..