कुंभमेळा परिसरात उत्तरप्रदेशचे राज्य शासन फक्त 30 भाविकांचा मृत्यू झाला असे सांगत असले तरी एका पत्रकार वाघाने शवागारात आपल्या कॅमेरामनसह अत्यंत चालाखीने प्रवेश केला आणि त्या ठिकाणी त्याला दिसलेल्या किंबहुना त्यांच्या कॅमेऱ्याने कैद केलेल्या चलचित्रांमध्ये प्रेतांच्यावर लावलेला क्रमांक 58 पाहिला आहे. का लपवत असतील मरणाऱ्या भाविकांची संख्या आणि भारतीय जनता पार्टीचे समर्थक चर्चेमध्ये सांगत आहेत अशा घटना घडत राहतात. सोबतच गोदी मिडीयाये पत्रकार 1964 ते 2013 दरम्यान घडलेल्या कुंभमेळ्यातील दुर्घटनाचा उल्लेख करून स्वत:ला वाचविण्याचा हा चुकीचा प्रयत्न चालविला आहे. खरे तर हा प्रकार पोलीसांवर व्हीव्हीआयपी बंदोबस्ताचा अतिरिक्त ताण आल्यामुळे घडला आहे. काय गरज होती एवढ्या व्हीआयपींनी तेथे जाण्याची, उत्तर प्रदेश मुख्यमंत्र्यांनी तर आपल्या राज्याची कॅबीनेट मिटींग तेथे घेतली. अनेक खाजगी व्यक्ती, खासदार, दुसऱ्या राज्यांचे मुख्यममंत्री, त्यांचे मंत्री आणि पुढे 5 फेबु्रवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जाणार आहे. पोलीसांवर 5 फेबु्रवारीच्या बंदोबस्ताचा ताण आजपासूनच सुरू असेल.
मौनी अमावस्येच्या दिवशी अमृतवेळेत स्नान करण्याच्या घाईत मागून आलेल्या भाविकांच्या लोंढ्याचा दबाव पुढे झोपलेल्या भाविकांवर पडला आणि चेंगराचेंगरी झाली. अशी घटना कोणी घडवत नसते. घटना घडली आहे. मग आता त्यात लपवायचे काय आहे. अनेक भाविकांचे नातलग एकदुसऱ्याशी दुरावले. चेंगराचेंगरी झाल्यानंतर कुंभमेळा प्रशासनातील कार्यरत प्रशासनिक अधिकारी, पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार आणि इतर संस्था यांच्यावर कामाचा प्रचंड दबाव आला. त्यामुळे त्यांनी जनतेला प्रतिसादच दिला नाही. त्यामुळे जनतेमध्ये मोठा रोष तयार झाला. या सर्व गडबडीची लाईव्ह कव्हरेज 4 पी.एम. हे चॅनल दाखवत होते. त्यांचा वाघासारखा पत्रकार क्षितिजकांत आणि कॅमेरामन सुमित यांनी 29 जानेवारीच्या पहाटे 2 वाजेपासून आपल्या कामाला सुरूवात केली. ते रात्री 12 वाजेपर्यंत धावळच करत होते. भाविक त्यांना विनंती करत होते, त्यांच्याकडे रडत होते तुमचे एकच चॅनेल आहे जे लाईव्ह कव्हरेज दाखवत आहे. आमच्या हरवलेल्या व्यक्तीचा फोटो दाखवून त्याला आमच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करा. त्या पत्रकाराने ते सुध्दा केले आणि अविरत काम करत राहिला.
चेंगराचेंगरी झाल्यानंतर अनेक ऍम्ब्युलन्स कामाला लावण्यात आल्या. त्यात घाटाजवळ पडलेले प्रेत मध्ये टाकण्यात आले. परंतू त्या प्रेताच्या नातेवाईकांना गाडीत बसण्यासाठी जागाच नव्हती. कारण एका गाडीत एकावर ऐक ठेवून चार प्रेत नेले जात होते. ऍम्ब्युलन्सचे ड्रायव्हर सांगतात 20 गाड्या या कामाला लागल्या होत्या आणि त्यांच्या सांगण्याप्रमाणे 80 प्रेत आणली गेली असावीत. तेंव्हा पत्रकार क्षितिजकांत यांनी शवागाराबाहेर रडत पडत असलेल्या एका वृध्द व्यक्तीला आणि त्यांच्यासोबतच्या एका युवकाला आपल्या विश्र्वासात घेतले आणि आम्हाला मध्ये घेवून चला म्हणजे आम्ही सुध्दा तुमची मदत करू आणि इतरांची सुध्दा त्यामुळे मदत होईल असे सांगितल्यानंतर आपल्या माणसाचे प्रेत मध्ये आहे काय हे पाहण्यासाठी ती रडणारी मंडळी आणि पत्रकार क्षितिजकांत आणि त्यांचा कॅमेरामन सुमित हे शवागारात गेले. क्षितिजकांतच्या सांगण्याप्रमाणे तेथे जगात प्रसिध्द असलेल्या बीबीसी या वृत्तसंस्थेच्या माणसाला सुध्दा प्रवेश नव्हता. बीबीसी फक्त खरे सांगते अशी त्यांची ख्यातीपण आहे. आजच्या परिस्थितीत भारतात वावरणारा मिडिया आपल्या सर्व कर्तव्यांना विसरुन फक्त मोदींना कसे चांगले दाखवता येईल याच प्रयत्नात आहे. क्षितिजकांत आत गेले तेंव्हा त्यांनी पाहिलेल्या परिस्थितीप्रमाणे तेथे तीन खोल्या होत्या आणि तिन्ही खोल्यांमध्ये प्रेतच प्रेत पडलेले होते. प्रत्येक प्रेतावर क्रमांक लावलेला होता. त्यांनी या क्रमांकांची शुटिंग केली तर त्यांना सर्वात शेवटचा क्रमांक 58 दिसला. तो क्रमांक कॅमेऱ्यामध्ये कैद झाला. याचा अर्थ 58 प्रेते तर तिथे होतीच. क्षितिजकांतला काही ऍम्ब्युलन्स ड्रायव्हर सांगत होते की, मृतांचा आकडा यापेक्षा जास्त असेल. त्या ठिकाणी क्षितिजने पाहिलेले परिस्थिती अशी आहे की, कोणी एखाद्या प्रेताला ओळखणारी माणसे आली. तर ते प्रेत त्याच्या तब्यात दिले जात होते आणि ऍम्ब्युलन्समध्ये टाकून ती ऍम्ब्युलन्स पळवून लावली जात होती. इकडे शासन अफवांवर विश्र्वास करू नका म्हणतो. अहो पण मरणाऱ्या लोकांची संख्या कमी करून काय साध्य होणार आहे. खरे तर मरणाऱ्या सर्वांचीच आकडेवारी खऱ्या अर्थाने प्रसिध्द केली पाहिजे आणि त्यांना आवश्यक ती मदत केली प ाहिजे. हे काम आहे सरकारचे. क्षितिज सांगत होता या तिन खोल्यांमध्ये 30 प्रेते असावीत असा प्रयत्न सुरू आहे. याहीपेक्षा क्षितिजच्या माहितीप्रमाणे त्याला लोक सांगत होते की, कुंभमेळ्यामध्ये बनवलेल्या वेगवेगळ्या सेक्टरपैकी अनेक सेक्टरमध्ये प्रेत अजूनही आहेत. म्हणजे त्याने पाहिलेला 58 आकडा हा नक्कीच क्रॉस झाला असणार.
खरे तर कुंभमेळ्यासाठी करण्यात आलेल्या जाहीरातींचा विचार केला तर ते पैसे का खर्च गेले. आजपर्यंत कुंभमेळ्याची जाहीरात कधी केली गेली नाही कारण कुंभमेळ्याला आपोआपच भाविक येत असतात. त्यांना बोलवायची गरज नसते असो. शासनाने जाहीराती देवून आपलीच प्रसिध्दी केली कुंभमेळ्याची नव्हे. कुंभमेळ्यात घडलेली दुर्घटना ही पहिली नाही. यापुर्वीसुध्दा अनेकवेळेस चेंगराचेंगरी झालेली आहे. पण त्यावेळेसच्या सरकारने कधीच मृतांचा आकडा लपविला नव्हता. आता मोदींची तारीफ करणाऱ्या गोदी मिडीयाने 1964 मध्ये झालेल्या कुंभमेळ्यातील घटनेचा उल्लेख करून पुन्हा एकदा प्रथम पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांची बदनामी सुरू केली आहे. पण याच 1964 मध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री नारायण दत्त तिवारी यांनी असा आदेश काढला होता की, कोणीही व्हीआयपी आला तर त्याला कोणताही प्रोटोकॉल मिळणार नाही हे सांगायला विक्री झालेल्या मिडीयाला लाज वाटते काय? तरी पण त्याही कुंभमेळ्यात बरेच व्हीआयपी आले होते. पण ते कधी आले आणि कधी गेले याचा मागमुस प्रशासनाला नव्हता. कारण ते सर्वसामान्य माणसाप्रमाणे आले आणि सर्वसामान्य माणसाप्रमाणेच आपले पाप धुवून निघून गेले. आता गंगा यमुना आणि सरस्वतीच्या संगमात डुबकी मारल्याने पाप धुतले जातात काय हा एक वेगळा विषय आहे.
पोलीसांना व्हीआयपी बंदोबस्त करतांना खर्च करावी लागणारी उर्जा एवढी असते की, तो पुढील पाच दिवस काम करू शकत नाही. उदाहरणार्थ एखाद्या व्हीआयपी दुपारी 3 वाजता येणार असेल तर पोलीसांची कुमक सकाळी 6 वाजल्यापासून त्या ठिकाणी हजर असते. कोणतीही भौतिक सुविधा त्यांच्यासाठी उपलब्ध नसते. त्यांच्या जेवणाची सोय कधी-कधी तरी होते. तरी पण ते कार्यरत असतात. कुंभमेळ्याचा कार्यकाळ हा 45 दिवसांचा आहे. त्या ठिकाणी कार्यरत असलेल्या अधिकारी, पोलीस अंमलदार आणि इतर कामगार यांना पर्याय दिला आहे काय? जेणे करून त्यांची काम करण्याची उर्जा कायम राहील. 10 हजार कोटी रुपये खर्च करून कुंभमेळ्याची तयारी केली आणि त्रिवेणी संगमावर जाण्याचा आणि परत येण्याचा मार्ग एकच आहे. त्यात संतांचा वेगळा, व्हीआयपींसाठीचा वेगळा आणि ही सगळी बडदास्त ठेवतठेवत त्यांच्या उर्जेचा फुगा कधी हवेत उडून गेला असेल हे सांगता येणार नाही. आता 5 फेबु्रवारी रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सुध्दा त्रिवेणी संगावर जाणार आहेत. त्यांनी सर्वसामान्य माणसाप्रमाणे 20 किलो मिटर पायी चालून जावे पण यात पोलीस विभागाची खर्च होणारी उर्जा एवढी असेल की, ते पुढील दहा दिवस काम करू शकणार नाहीत आणि आजपासूनच ते कामाला लागले असतील.
एकंदरीतच मरण पावलेल्या भाविकांची संख्या लपवून मिळणार काय, कोणाला मिळणार आणि ते कशासाठी प्रयत्न करत आहेत हा एक शोध प्रबंध लिहिण्याचा विषय आहे. काही मोदी भक्त तर चेंगरा-चेंगरी सुरू झाली तेथील भाविकांवरा कार्यवाही करा अशी मागणी करत आहेत. किती दुर्देव ना. कुंभमेळ्यामध्ये सरकारने दाखवलेले 30 भाविक आणि 4 पी.एम.चॅनल दाखवते ते 58 आणि काही अनामीक भाविक या सर्वांच्या प्रती वास्तव न्युज लाईव्ह आपल्यावतीने भावपुर्ण श्रध्दांजली व्यक्त करत आहे आणि प्रत्येकाला सदसद विवेक बुध्दीने वागण्याची विनंती करत आहे.
सरकार म्हणते कुंभमेळ्यात 30 जणांचा मृत्यू झाला आणि 4 पी.एम. दाखवते 58 जणांची प्रेते
