नांदेड(प्रतिनिधी)-लोहा येथे श्रीमती आर.जी.वैराळे मल्टीस्टेट को.ऑप.के्रडीट सोसायटीमध्ये जवळपास 1 कोटी रुपयांचा घोळ झाल्याची तक्रार 8 पिग्मी एजंटांनी पोलीस अधिक्षक नंादेड यांच्याकडे दिली आहे.
लोहा येथे े श्रीमती आर.जी.वैराळे मल्टीस्टेट को.ऑप.के्रडीट सोसायटी कार्यरत होती. त्यात पिग्मी एजंट या पदावर गोविंद हरीभाऊ पवार, सचिन भानुदास मुडसे, मंगेश मारोती वंजारे, शेख सिकदर शेख बाबु, हनमंत मनोहर कागणे, अनिल किशनराव वट्टमवार हे कार्यरत होते. सोसायटीने त्यांना दाखवलेल्या कमिशनच्या लोभात अडकून त्यांनी अनेक सदस्य बनवले.पण त्यांना मिळणारा कमिशनचा भाग आणि गुंतवणुकदारांना मिळण्याचा हक्क मिळत नव्हता. तेंव्हा सध्याचे या सोसायटीचे अध्यक्ष अमोल बाजीराव ढगे, सचिव गजानन उत्तमराव शिंदे, उपाध्यक्ष मनोजकुमार श्रावण दिवेकर, लोहा शाखाचे अध्यक्ष सुनिल भानुदास मैड, सदस्य गौतम गुणाजीराव वैराळे, आत्माराम रामजी मानुरकर, त्र्यंबक हनमंतराव पाटील, दत्ताहरी बाबाराव कदम, हिरामण दशरथ घोरबंद, ऐश्वर्या अमोल ढगे, लताबाई बालाजी ढगे आणि विनोदकुमार बद्रीनारायण धुत यांच्याकडे अनेक वेळा आपल्यासोबत झालेल्या फसवणुकीची तक्रार केली आणि न्याय मागितला. पण त्यांना कोणीच प्रतिसाद दिला नाही म्हणून या सर्व 8 जणांनी पोलीस अधिक्षक नांदेडकडे वेगवेगळे अर्ज देवून असे म्हटले आहे की, तुमच्या कमिशनपेक्षा 2 टक्के जास्त कमीशन देवू तसेच खातेदारांना अर्थात गुंतवणूकदारांना 12 टक्केऐवजी 15 ते 18 टक्के परतावा देवू परंतू असे काही घडले नाही आणि आमची फसवणूक झाली आहे. आपल्या अर्जात अर्जदारांनी 2017 ते 2022 आणि सन 2013 ते 2017 या कालखंडात कोणते कार्यकारी मंडळ सोसायटीत कार्यरत होते. यांची यादी पण सादर केलेली आहे. या अर्जाचा तपास करण्यासाठी हा अर्ज लोहा पोलीस ठाण्याकडे पाठविण्यात आला असल्याची माहिती अर्जदारांनी स्वत: वास्तव न्युज लाईव्हला दिली आहे.
लोहा येथील श्रीमती आर.जी.वैराळे मल्टीस्टेट को.ऑप.के्रडीट सोसायटीत करोडोचा घोटाळा-निवेदन
