नांदेड(प्रतिनिधी)-अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष एस.एम. देशमुख यांनी नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष पद भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्याला सादर केले आहे.
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष एस.एम. देशमुख हे नेहमीच पत्रकारांच्या भल्यासाठी राज्य शासन आणि केंद्र शासन यांच्यासोबत पंगा घेत आलेले आहेत. आपल्या मेहनतीने त्यांनी पत्रकारांच्या बऱ्याच प्रलंबित मागण्यांना शासनापुढे मांडले आहे. महाराष्ट्रात आणि केंद्रा दोन्ही ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे शासन आहे.
नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघात निवडणुकीची चर्चा सुरू झाली. त्यानंतर अनेकांनी अध्यक्ष पदावर आपली आवड दाखवली. त्यानंतर चार जणांना गुपचूप बोलावून निवडणुक निरिक्षकाने त्यांच्याकडून एस.एम.देशमुख यांचा निर्देशन मान्य राहिल असे लिहुन घेतले होते. पण त्या चार पैकी तीन जणांनी लिहुन दिले होते पण एकाने लिहुन दिलेले नाही. सर्वसामान्य मतदारांसोबत कोणतीही चर्चा न करता अखेर 1 जानेवारी 2025 रोजी नांदेड जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते असलेल्या संतोष पांडागळे यांना नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष पद बहाल करतांना कार्यकारी अध्यक्ष हाच पुढे अध्यक्ष होतो अशी सारवा सारव केली आहे. संतोष पांडागळे इंग्रजी शिकवता शिकवता मराठीचे धड्डे द्यायला लागले. त्याच प्रमाणे त्यांना हे पद प्राप्त झाले आहे. मनातून नसले तरी वास्तव न्युज लाईव्हच्यावतीने एस.एम.देशमुख यांचे धन्यवाद आणि संतोष पांडागळे यांचे अभिनंदन…