नांदेड(प्रतिनिधी)- सोनखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने दोन हायवा पकडल्या आहेत. ज्यामध्ये चोरीची आणि बेकायदेशीर वाळू भरलेली होती.
अंगद हंसाजी कदम या पोलीस अंमलदाराने दिलेल्या तक्रारीनुसार दि. 27 डिसेंबर रोजी सकाळी 5 वाजेच्या सुमारास सोनखेड ते दगडगाव या रस्त्यावर गस्त करत असताना हायवा गाडी क्र. एमएच 26 बीई 2349 पकडली. ज्यामध्ये 4 ब्रास गौण खनिज अर्थात वाळू भरलेली होती. वाळूच्या संदर्भाने कोणतेही कागदपत्रे नव्हते. तसेच दुसरी एक हायवा गाडी क्र. एमएच 12 क्युजी 1641 पकडली, त्यामध्ये सुद्धा वाळू भरलेली होती. दोन्ही गाड्यांमध्ये असलेल्या वाळूची किंमत 40 हजार रूपये आणि दोन गाड्यांची किंमत 35 लाख रूपये असा एकूण 35 लाख 40 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी सोनखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षही व्ही.एस. आरसेवार, पोलीस अंमलदार विलास बारूळे, नंदू पवार, राजेश नागनपल्ले, शेख खलील आणि मारोती सोनटक्के यांनी ही कारवाई केली.