ताज्या बातम्या विशेष

टेरर फंडींग प्रकरणात रिंदाचे वडील आणि भावाची रवागनी आता तुरूंगात

नांदेड(प्रतिनिधी)-टेरर फंडींग प्रकरणात रिंदाच्या मित्राला 7 जुलै रोजी अटक केल्यानंतर काल दि.28 नोव्हेंबर रोजी आंतर राष्ट्रीयकिर्तीचा अतिरेकी हरविंदरसिंघ उर्फ रिंदा संधू याचे वडील आणि भावाला अटक करण्यात आली होती. न्यायालयाने त्या दोघांना आज दि.4 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले होते आज पोलीस कोठडी संपल्यानंतर पोलीसांनीच त्यांना न्यायालयीन कोठडीत घेण्याची विनंती केल्यानंतर या दोघांची रवानगी सध्या तरी तुरूंगात झाली आहे.

कुख्यात अतिरेकी हरविंदरसिंघ उर्फ रिंदा संधू याने 100 कोटी रुपयांची वसुली मी केली होती ते पैसे मी कसे वापरणार याचे विस्तृत विवरण एका टी.व्ही.मुलाखती केले होते. या मुलाखतीपुर्वी रिंदा मरण पावला अशा अफवा उठल्या होत्या. त्यानंतरच रिंदाने ती मुलाखत दिली होती. या मुलखतीनंतर नांदेडमध्ये अनेक जणांनी रिंदाचे नाव वापरून खंडणी वसुल केल्याचे अनेक गुन्हे घडले. काही गडगंज श्रीमंतांनी रिंदाला खंडण्यापण करोडो रुपयांच्या संख्येत दिलेल्या आहेत. त्यानंतर त्या गडगंजांनी स्वत:साठी आम्हाला रिंदापासून धोका आहे म्हणून पोलीस सुरक्षा रक्षक मिळवले असो. या प्रकरणी वजिराबाद पोलीस ठाण्यात तत्कालीन स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा क्रमांक 119/2023 वजिराबाद पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास शहर उपविभागाचे पोलीस उपअधिक्षक सुरज गुरव यांच्याकडे देण्यात आला. 1 कोटी रुपयांची खंडणी रिंदाने मागितली त्यानंतर खंडणी ज्या व्यक्तीला मागितली त्याच्या नातलगाने भरतकुमार धरमदास पोपटाणी (40) या रिंदाच्या लहानपणीच्या मित्राशी संपर्क साधला. नंतर ती 1 कोटीची खंडणी 40 लाखांपर्यंत घसरली आणि खंडणीचा व्यवहार पुर्ण झाला होता.

अत्यंत कासवगतीने परंतू कायद्याच्या कक्षेत या गुन्ह्याचा तपास सुरू होता. 5 जुलै रोजी भरत पोपटाणीला अटक झाली त्यानंतर तुरूंगात असलेल्या काही आरोपींना या गुन्ह्यात अटक झाली. भरतकुमार पोपटाणी हा प्रख्यात बांधकाम व्यवसायीक संजय बियाणी यांच्या हत्येदरम्यान सुध्दा पोलीसांच्या ताब्यात होता परंतू त्याला नंतर सोडून देण्यात आले होते. या प्रकरणातील खंडणी देणाऱ्याचे नाव पोलीसांनी आजही गुप्त ठेवले आहे.

दि.28 नोव्हेंबर रोजी पोलीस उपअधिक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनात हरविंदरसिंघ उर्फ रिंदाचे वडील चरणसिंघ संधू आणि त्याचा भाऊ सरबज्योतसिंघ संधू या दोघांना अटक करण्यात आली. आज पोलीस उपअधिक्षक सुरज गुरव यांचे सहकारी पोलीस अधिकारी संतोष शेकडे, चंद्रकांत पवार, शिवराज जमदडे, दशरथ आडे यांच्यासह अनेक पोलीस अंमलदार, क्युआरटी पथक यांनी पकडलेल्या संधू पिता-पुत्राला मोठ्या सुरक्षेत न्यायालयात हजर केले होते. त्यावेळी न्यायालयाने या दोघांना पाच दिवस अर्थात 4 डिसेंबर 2023 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले. आज पोलीस कोठडी संपल्यानंतर पोलीसांनीच या दोघांना न्यायालयीन कोठडीत घेण्याची विनंती केल्यानंतर न्यायाधीश सी.व्ही.मराठे यांनी या दोघांची रवानगी तुरूंगात केली आहे.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *