ताज्या बातम्या नांदेड

विद्याभवन प्राथमिक शाळा, धनेगाव येथील शिक्षकाने घेतली 50 हजारांची लाच;संस्था चालक सुद्धा आरोपी 2 लाख आणि तीन महिन्यांच्या वेतनातील अर्धी पगार आणि दोन लाख लाच हवी होती

कंधार,(प्रतिनिधी)- आपल्याच शाळेतील शिक्षकाला त्याचे काम करण्यासाठी 2 लाख रुपये आणि तीन महिन्याचे वेतन मिळाल्यानंतर त्यातील अर्धे वेतन अशी लाच मागणी करून पहिला हप्ता 50 हजार रुपये लाच स्वीकारल्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने एक सहशिक्षक जेरबंद केला आहे.

यातील तक्रारदार हे भारती शिक्षण प्रसारक मंडळ, समर्थ नगर, नांदेड येथील विद्याभवन प्राथमिक शाळा, धनेगाव, ता. जि. नांदेड येथे मुख्याध्यापक पदावर कार्यरत होते. त्यांना निलंबीत करण्यात आले होते. त्यांचे निलंबन आदेश रद्द करण्यासाठी व मागील 12 वर्षाची वरिष्ठ वेतन श्रेणी लागु करून निलंबनाचे प्रकरण मिटवून घेण्यासाठी व वेळोवेळी दिलेल्या अर्जित रजा मंजूर करणेकरिता, यातील संस्था चालक बळीराम पवार व सहशिक्षक सुनिलदत्त खिराडे यांनी तक्रारदार यांना त्यांचा 3 महिन्याचा अर्धा पगार व 2,00,000/- रूपयाची मागणी केली. 2,00,000/- रूपये व 3 महिन्याचा अर्धा पगार ही लाच असल्याची तक्रारदार यांना खात्री झाल्याने त्यांना ती द्यावायची नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड येथे याबाबत तक्रार दिली.

त्यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड येथील सापळा पथकाने दि. 15/09/2023 रोजी लाच मागणी पडताळणी केली असता, पडताळणी दरम्यान तक्रारदार यांना शासकीय पंचासमक्ष यातील सहशिक्षक सुनिलदत्त खिराडे यांनी दि. 01/10/2023 रोजीपावेतो टप्प्या टप्प्याने दोन लाख रूपये, पगार निघाल्यानंतर 3 महिन्याचा अर्धा पगार पैकी आज पहिला हप्ता 50,000/- रूपये दया अशी लाचेची मागणी केली. संस्था चालक बळीराम पवार यांनी 1 तारखे पर्यंत काम करा असे म्हणून लाच स्विकारण्यास संमती दिली.

यातील सहशिक्षक सुनिलदत्त खिराडे यांनी वरील कारणासाठी संस्था चालक बळीराम बालाजी पवार यांच्यासाठी शासकीय पंचासमक्ष आज दि. 15/09/2023 रोजी लाचेची मागणी करून यातील पहिला हफ्ता 50,000/- रुपयाची लाच कंधार येथे स्विकारली.

यावरून भारती शिक्षण प्रसारक मंडळ, समर्थ नगर, धनेगाव, ता. जि. नांदेड चे संस्था चालक बळीराम बालाजी पवार व सहशिक्षक सुनिलदत्त खिराडे यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन कंधार, जि. नांदेड येथे गुन्हा दाखल करण्यात आलं आहे.सहशिक्षक सुनिलदत्त खिराडेला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे.

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ.राजकुमार शिंदे (मोबाईल नंबर- 9623999944),पर्यवेक्षण अधिकारी पोलीस उप अधीक्षक राजेंद्र पाटील (मो- 7350197197) यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अविनाश खंदारे,पोलीस लीस निरीक्षक गजानन बोडके,पोलीस अंमलदार संतोष वच्चेवार,राजेश राठोड,ईश्वर जाधव, चापोह मारोती सोनटक्के, अँटी करप्शन ब्युरो, युनिट नांदेड यांनी हि कार्यवाही पूर्ण केली.

नांदेड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्यावतीने खाजगी इसम (एजेंट)यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेचमागणी करीत असल्यास तात्काळ खालील दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. दुरध्वनी क्रमांक 02462-253512 आणि टोल फ्रि क्रं. 1064.

 

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *