नांदेड(प्रतिनिधी)- नांदेड जिल्हा पोलीस दलातून आज आपल्या विहित वयाच्या अनुषंगाने 3 सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक आणि तीन पोलसी अंमलदार सेवानिवृत्त झाले त्यांना निरोप देतांना पोलीस उपअधिक्षक डॉ.अश्र्विनी जगताप यांनी भविष्यातील जीवनासाठी शुभकामना दिल्या.
आज 28 फेबु्रवारी 2023 या दिवशी आपली विहित पोलीस सेवा पुर्ण करणारे सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक अन्वर एकबाल शेख अमीर लतीफ (पोलीस ठाणे ईस्लापूर), अशोक बळीराम भिसे (पोलीस मुख्यालय), ओमदेव शिरु जुगनाके(किनवट), पोलीस हवालदार प्रकाश देविदास देशमुख (लिंबगाव), लक्ष्मीकांत गंगाधर चारतवाड(मुखेड), शेख शब्बीर हुसेनसाब (मरखेल) यांची पोलीस सेवा पुर्ण झाली.
पोलीस अधिक्षक कार्यालयातील सभागृहात पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनात गृहपोलीस उपअधिक्षक मुख्यालय डॉ.अश्र्विनी जगताप, नियंत्रण कक्षातील पोलीस निरिक्षक अनिल चोरमले, जनसंपर्क अधिकारी शिवाजी लष्करे, पोलीस कल्याण विभागातील सहाय्यक पोलीस निरिक्षक कमल शिंदे यांच्या उपस्थितीत सेवानिवृत्तांना निरोप देतांना डॉ.अश्र्विनी जगताप यांनी सर्वांच्या भविष्यातील जीवनासाठी शुभकामना दिल्या. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक विठ्ठल कत्ते यांनी केले. पोलीस निरिक्षक अनिल चोरमले यांनी आभार व्यक्त केले. पोलीस कल्याण विभागाच्या पोलीस अंमलदार राखी कसबे यांनी या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले.
