औरंगाबाद,(प्रतिनिधी)- आज महाराष्ट्र न्यायाधिकरण प्राधिकरणात होणार आहे स्थानिक गुन्हा शाखेच्या खुर्चीसाठीची सुनावणी. कोण जिंकणार आणि कोण हरणार या पॆक्षा जास्त मोठा निर्णय हा असणार आहे की,कोणी-कधी-केव्हा काय करायला हवे आणि ते सत्य असावे.याचा निर्णय आला तर अनेकांना आपल्या जीवनातील राजकारणाची दिशा बदलावी लागेल.
नांदेड जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेची खुर्ची रिकामी ठेवण्यासाठी सत्ताधारी राजकीय पक्षाच्या एका नेत्याने भरपूर वजन वापरले.पण राज्य पोलीस सेवेततुन भारतीय पोलीस सेवेत आपले स्थान निश्चित करणाऱ्या पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे नांदेड यांनी स्थानिक गुन्हे शाखा रिकामी तर ठेवलीच नाही,तेथे वजिराबादचे पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार यानां नियुक्ती दिली.स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांना नांदेड ग्रामीण पोलीस ठाणे दिले.नांदेड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक श्री अशोकरावजी घोरबांड यांना शहरात दाखल होणारया रस्त्यावरील पोलीस ठाणे अर्धापूर बहाल केले.हा निर्णय आणि नियुक्त्या झाल्यानंतर पुन्हा एकदा शिळ्या कढीला ऊत आणण्याचा प्रयत्न झाला.पण ती कढी पातेल्या बाहेर आलीच नाही,तर पेल्यातील वादळ या स्वरूपातच थांबली.
दरम्यान द्वारकादास चिखलीकर यांनी नांदेडला आले तेव्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे आणि त्यांच्यात खडाजंगी झाली असे बोलले जाते.कारण नांदेडला येतांना द्वारकादास चिखलीकरांनी न्यायधिकरणाकडून आपल्यासाठी स्टे आणला होता.आज या स्टे वर पोलीस अधीक्षकांचे म्हणणे सादर करण्यासाठी पोलीस उप अधीक्षक डॉ.सिद्धेश्वर भोरे हे औरंगाबादला आलेले आहेत.तसेच स्टे प्राप्त पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर सुद्धा औरंगाबाद मध्येच अर्थात मॅट न्यायालयात हजर आहेत.आज सुनावणी झालीच तर निर्णय येणार काय ? तारीख वाढणार काय ? स्टे कायम राहणार काय ? असे अनेक प्रश्न आहेत .ज्याचे उत्तर काही तासातच समोर येणार आहेत.
या मॅट प्रकरणाचा निकाल आल्या नंतर मात्र प्रकरणाशी संबंध असणाऱ्या अनेकांना हा धडा मात्र नक्कीच मिळणार आहे की कधी-कोठे-केव्हा आपण बोलले पाहिजे जेणे करून आपलीच चेष्ठा होणार नाही.असो. या प्रकरणामुळॆ अद्याप नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे मागील दोन वर्षांपेक्षा जास्त काळ तोंडी आदेशावर कार्यरत पोलीस निरीक्षकांच्या काही काळ वाढला आहे.वजिराबाद पोलीस ठाण्यात नियुक्त पोलीस निरीक्षक विकास पाटील नांदेडला आलेले आहेत.पण त्यांनी वजिराबादचा प्रभार स्वीकरलेला नाही,बहुदा स्थानिक गुन्हे शाखेची खुर्ची रिकामी नसल्याने ते जाणार कसे असा प्रश्न उपस्थितझाला आहे. पाहूया या बुद्धिबळाच्या पाटीवर कोण कोणाला शाह देणार.