पदोन्नतीच्या प्रतिक्षेत असलेल्या तीन अपर पोलीस महासंचालक, चार विशेष पोलीस महानिरिक्षक आणि एक पोलीस उपमहानिरिक्षकांना नवीन नियुक्त्या
नांदेड(प्रतिनिधी)-पदस्थापनेच्या प्रतिक्षेत असणाऱ्या भारतीय पोलीस सेवेतील 3 अपर पोलीस महासंचालक, 4 विशेष पोलीस महानिरिक्षक आणि 1पोलीस उपमहानिरिक्षक यांना नवीन जागी नियुक्ती देण्याचे आदेश गृहविभागाचे सहसचिव व्यंकटेश भट यांच्या स्वाक्षरीने जारी झाले आहेत. या नवीन नियुक्त्यांमध्ये नांदेड पोलीस परिक्षेत्रात पोलीस उपमहानिरिक्षक एस.एच.महावरकर यांची नियुक्ती झाली आहे.
शासनाने नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले अपर पोलीस महासंचालक बिपीनकुमार सिंह यांना अपर पोलीस महासंचालक आर्थिक गुन्हे शाखा मुंबई येथे नियुक्ती दिली आहे. प्रभातकुमार यांना अपर पोलीस महासंचालक व उपमहासमादेशक होमगार्ड मुंबई अशी नियुक्ती दिली आहे. प्रभातकुमार नांदेड शहराचे सहाय्यक पोलीस अधिक्षक सुध्दा होते. विनित अग्रवाल यांना अपर पोलीस महासंचालक व मुख्य दक्षता अधिकारी म्हाडा मुंबई अशी नियुक्ती दिली आहे.
नवीन नियुक्त्या मिळालेले विशेष पोलीस महानिरिक्षक पुढील प्रमाणे आहेत. राजकुमार व्हटकर-विशेष पोलीस महानिरिक्षक प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य मुुंबई झाले आहेत. काही दिवसांपुर्वी काही दिवसांसाठी नांदेडमध्ये आलेले जय वसंतराव जाधव यांना विशेष पोलीस महानिरिक्षक महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग मुंबई येथे नियुक्ती मिळाली आहे. कैसर खालीद यांना विशेष पोलीस महानिरिक्षक मोटार परिवहन विभाग महाराष्ट्र राज्य पुणे येथे नियुक्ती मिळाली आहे. बी.के.पाटील भुजबळ यांना विशेष पोलीस महानिरिक्षक गुन्हे अन्वेषण विभाग महाराष्ट्र राज्य पुणे येथे नियुक्ती मिळाली आहे.
नवीन नियुक्त्या मिळालेल्या भारतीय पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांमध्ये पोलीस उपमहानिरिक्षक असलेले एस.एच.महावरकर यांना नांदेड पोलीस परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरिक्षक हे पद प्राप्त झाले आहे.