नांदेड(प्रतिनिधी)-हाडांच्या उपचारासाठी शासनाच्या अनेक योजनांचा फायदा होतो. जनतेने त्याचा उपयोग घ्यावा तसेच उद्या दि.26 फेबु्रवारी रोजी नांदेडच्या यशोसाई हॉस्पीटमध्ये सकाळी 9 ते दुपारी 2 यावेळेते मोफत हाडांच्या उपचारांची तपासणी होणार आहे. नागरीकांनी याचा फायदा घ्यावा असे आवाहन पुण्यातील 50 वर्षापासून सेवेत असलेले संचेती हॉस्पीटलचे संचालक डॉ.पराग संचेती यांनी केले आहे.
आज पुण्यातील संचेती हॉस्पीटलचे संचालक डॉ.पराग संचेती, त्याच हॉस्पीटलमध्ये कार्यरत स्पाईन सर्जन डॉ.सिध्दार्थ अय्यर आणि नांदेड येथील यशोसाई हॉस्पीटलचे डॉ.उमेश देशपांडे यांनी पत्रकारांना ही महिती दिली. संचेती हॉस्पीटल, संचेती इंस्टिट्युट फॉर अर्थोपेडीत सेंटर, लॉयन्स क्लब मिडटाऊन यांच्या संयुक्त विद्यमाने यशोसाई हॉस्पीटल कौठा येथे सकाळी 9 ते दुपारी या वेळेत नागरीकांसाठी मोफत हाडांच्या रोगांची तपासणी करण्यासाठी शिबिर आयोजित करण्यात आल्याची माहिती दिली. या तपासणीमध्ये सांधे रोग तज्ञ डॉ.पराग संचेती, मनका विकार तज्ञ डॉ.प्रमोद धिलारे, डॉ.सिध्दार्थ अय्यर ही तपासणी करणार आहेत. जनतेने या मोफत तपासणीचा उपयोग घ्यावा असे आवाहन डॉक्टरांनी केले. डॉ.पराग संचेती यांचे वडील पद्मविभूषण डॉ.संचेती यांनी सुरू केलेले संचेती हॉस्पीटल आज 50 वर्षाचे होत आहेत. या 50 वर्षात जवळपास 50 लाख रुग्णांना सेवा देण्यात आली आहे. रुग्ण सेवा हीच ईश्र्वर सेवा असे ब्रिद वाक्य संचेती हॉस्पीटलचे आहे. संचेती हॉस्पीटल हे भारतातच नव्हे तर संपूर्ण आशिया खंडात प्रसिध्द आहे. या हॉस्पीटलमध्ये हाडांवर उपचार केला जातो. हाडांचे आजार हा संपुर्ण कुटूंबामध्ये महत्वाचा विषय आहे. विशेषत: ज्येष्ठ व्यक्तींना हाडांच्या अनेक समस्या उदभवतात. वय वाढतांना या समस्या वाढू नये त्यासाठी लवकर काळजी घेतली तर हे आजार टाळणे सहज शक्य होते. मणके आणि गुडघ्यांच्या समस्यांसाठी संचेती हॉस्पीटल राज्यातच नव्हे तर जागतिक पातळीवर प्रसिध्द आहे. सध्या या हॉस्पीटलमध्ये अत्याधुनिक अशा नवीन ग्रीन स्मार्ट आणि हायटेक सुविधा तयार करून नवीन 12 मजली इमारतीचे काम पुर्ण होत आले आहे. त्यामध्ये तीन मजले भुमिगत पार्किंग आहे. ऑर्थो, स्पाइन, न्युरोसर्जरी, रोबोटिक गुडघे ,खुबा रोपण आणि रोबोटिक ओ आर्म स्पाइन सर्जरी यासह आठ हायटेक ऑपरेशन थेटर उपलब्ध आहेत. या हॉस्पीटलमध्ये काम करणारे डॉ.सिध्दार्थ अय्यर यांनी एम एस ऑर्थो शिक्षण पुर्ण केल्यानंतर सध्या ते ऑर्थोपेडीक स्पाइन सर्जन आहेत. वॉशिंगटन येथून त्यांनी फेलोशिप पुर्ण केली. जागतिक दर्जाच्या डॉक्टरांसोबत काम करण्याची संधी त्यांना मिळाली. पुणे, महाराष्ट्र, भारतसह जगातील सर्वोत्तम स्पाइन सर्जन म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केलेली आहे.