नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी पोलीस निरिक्षक, सहाय्यक पोलीस निरिक्षक आणि पोलीस उप निरिक्षक अशा सर्व अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. काही जण आपल्या नवीन नियुक्तीच्या जागी हजर झाले. दरम्यान स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलीस निरिक्षकांनी आणलेली स्थगिती प्रसार माध्यमांना बातमी झाली आणि काही राजकीय व्यक्तीमत्वांना अखरली. तरी पण प्रशासनातील नियमांना धरुन आज पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर न्यायालयाच्या आदेशानुसार आपल्या कर्तव्यावर रुजू झाले आहेत. या पुढे काय-काय घडामोडी होतील हे दिसेलच. खोक्यांचा आरोप प्रशासनावर करणाऱ्यांनी आपल्याकडील आलेल्या खोक्यांचा हिशोब दाबण्याची पण काही गरज नसते असेच या घडामोडी वरून वाटते.
18 फेबु्रवारीच्या स्वाक्षऱ्या असलेल्या बदल्यांचे आदेश त्या दिवशी आणि 19 फेबु्रवारी रोजी सुट्टी असल्यामुळे 20 फेबु्रवारी रोजी जाहीर झाले. दरम्यान पोलीस अधिक्षक छत्रपती राजा श्री शिवाजी महाराज यांच्या जयंती सोहळ्याचा बंदोबस्त करून दोन दिवसांच्या सुटीवर गेले. त्या अगोदर काही आपल्या व्यक्तीगत कामांसाठी पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी दहा दिवसांची रजा घेतली होती. ते ही सुट्टीवर निघून गेले. पण 20 तारखेला बदल्या जाहीर होताच पुन्हा चर्चेला उधाण आले. लोखंडी पुरूष आणि सोंगाड्या या दोन लोकांची स्वप्ने या बदली आदेशाने भंग झाली होती. त्यात सोंगाड्याला नांदेडला आणण्यासाठी सत्ताधीश राजकीय पक्षातील एका व्यक्तीने केलेला अकांड तांडव महत्वाचा आहे. त्यांनी तर पोलीस अधिक्षकांना स्थानिक गुन्हा शाखा रिकामी ठेवा असे सांगितले होते म्हणे. तरीपण पोलीस अधिक्षकांनी आपल्या अभ्यासाच्या जोरावर, सर्व जमा केलेल्या माहितीला अनुसरुन राजकीय व्यक्तीच्या म्हणण्याप्रमाणे द्वारकादास चिखलीकरांना स्थानिक गुन्हा शाखेतून काढले. पण ती जागा रिकामी ठेवली नाही. त्या जागी पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांची नियुक्ती केली. ती सुद्धा राजकीय व्यक्तिमत्वाला चांगलीच अखरली.
भारतीय संविधानाने भारतातील प्रत्येक नागरीकाला आपले हक्क प्रदान केलेले आहेत. ज्यांना या हक्कातील जाणिव असते त्यानुसार ते आपले हक्काचे दावे विविध सक्षम पिठासमोर मांडतात. कधी कोणाला यश येते, कधी कोणाला अपयश येते. यश- अपयशाची विविध कारणे असतात. त्याचा उल्लेख आज करण्याची गरज नाही. यातील एक महत्वाचा मुद्दा आम्ही नक्की उपस्थितीत करू इच्छीतो आपल्या खोक्यांचा हिशोब लपवून इतरांच्या खोक्याचा हिशोब करतांना राजकीय व्यक्तीमत्वाने त्याची सत्यता पडताळलीच नाही. काळ्या चहाचा शरमिंदा नसलेल्या अधिकाऱ्याविरुध्द दीड खोक्याचा आरोप करून टाकला. ज्याच्यासमोर आरोप करण्यात आला. त्यांनी किती दखल घेतली, काय-काय ते बोलले या संदर्भाचे आत्मपरिक्षण त्या राजकीय व्यक्तीमत्वाने करण्याची गरज आहे.
पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी 20 तारखेपासून दहा दिवसांची घेतलेली सुट्टी हा त्यांचा अधिकार होता. आपल्या जीवनात, आजपर्यंतच्या पुर्ण पोलीस सेवेत कधीही एक दिवसांची आजारी रजा न घेणाऱ्या पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकरांना काही आपली व्यक्तीगत कामे नसतील काय? त्यात एक काम मॅट कोर्टात दावा दाखल करणे हे पण होते. नेहमीच नशीबान असलेल्या द्वारकादास चिखलीकरांना मॅट कोर्टाने दुसऱ्याच दिवशी एकतर्फी स्थगिती दिली. त्या मॅट कोर्टातील मुळ दावा आणि आदेश प्राप्त झाल्यानंतर बरीच नवीन माहिती सुध्दा समोर येईल. आज त्यांच्या भावाच्या मुलीचे लग्न होते. ते आटोपून 24 फेब्रुवारी रोजी रात्री 10.30 वाजेच्यासुमारास न्यायालयाच्या स्थगिती आदेशासह ते नांदेडला आपल्या कर्तव्यावर हजर झाले आहेत.
संबंधीत बातमी….
ज्याचा मास्टर माईंड श्रीकृष्ण आहे त्याच्या नादाला कोणी लागू नये; चिखलीकरांच्या बदलीला स्थगिती