नांदेड(प्रतिनिधी)-कोणतीही पदवी प्राप्त न करता वास्तुशास्त्र ज्ञान असलेल्या संत गाडगेबाबा यांच्या जयंती दिनी अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पअर्पण करून अभिवादन केले.
आज दि.23 फेबु्रवारी रोजी संत गाडगे बाबा यांचा जन्मोत्सव सोहळा साजरा केला जातो. संपुर्ण देशाला साफ सफाईचा संदेश देणाऱ्या संत गाडगेबाबांना आज पोलीस अधिक्षक कार्यालयात अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले. याप्रसंगी जनसंपर्क अधिकारी सहाय्यक पोलीस निरिक्षक शिवाजी लष्करे यांच्यासह पोलीस अधिक्षक कार्यालयातील सर्व पोलीस अधिकारी, सर्व पोलीस अंमलदार, मंत्रालयीन अधिकाीर आणि मंत्रालयीन कर्मचारी मोठ्या संख्येत हजर होते. या कार्यक्रमाचे आयोजन सहाय्यक पोलीस निरिक्षक सुर्यभान कागणे, संजय सांगवीकर, शामका पवार, विनोद भंडारे यांनी केले.
