नांदेड(प्रतिनिधी)-एका 28 वर्षीय युवकाला वेगवेगळ्या शस्त्रांनी हल्ला करून त्याचा जिवघेण्याचा प्रयत्न करणाऱ्या चार भंडारी कुटूंबियांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हा 15 फेबु्रवारी रोजी घडला होता. पण दाखल 22 फेबु्रवारी रोजी दाखल झाला आहे.
देवानंद गंगाधर मोगले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.15 फेबु्रवारी रोजी मध्यरात्री 12 ते 12.30 या वेळेदरम्यान ते परिमलनगर भागातून आपल्या घराकडे समतानगरकडे जात असतांना महादेव मंदिराजवळ विशाल भंडारी, अमोल भंडारी, कृष्णा भंडारी आणि ओमकार भंडारी या चौघांनी त्यांना अडवले आणि 31 डिसेंबर 2022 रोजी झालेल्या भांडणाचे कारण सांगून तलवारीसारखे हत्यार, लोखंडी खंजर यांच्या सहायाने मोगले यांच्या डोक्याला, कानामागे, छातीत, खांद्याच्या डाव्या बाजूला अनेक वार करून त्यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने जखमी केले. भंडारी कुटूंबिय परिमलनगर भागात राहते. भाग्यनगर पोलीसांनी हा गुन्हा 22 फेबु्रवारी रोजी भारतीय दंड संहितेच्या कलम 307, 324, 323, 504, 34 आणि भारतीय हत्यार कायद्याच्या कलम 4/25 आणि 4/27 नुसार गुन्हा क्रमांक 72/2023 दाखल केला आहे. या गुन्ह्यात ऍट्रॉसिटीचे कलम मात्र जोडलेले नाही. देवानंद मोगले हे बौध्द जातीचे आहेत असे पोलीस अभिलेखात लिहिले आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पेालीस निरिक्षक पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे.
